Mumbai Art Exhibition  SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Art Exhibition : चित्रांचा कलाविष्कार! प्रसिद्ध चित्रकाराचे मुंबईत प्रदर्शन, अप्रतिम 'जलरंग कलाकृती' पाहायला कुठे अन् कधी जाल?

Shailesh Meshram 'Places and Faces' Art Exhibition In Mumbai : मुंबईत चित्रकार शैलेश मेश्राम यांच्या 'प्लेसेस अँड फेसेस' या विशेष जलरंग चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकाण आणि प्रदर्शनाची तारीख जाणून घ्या.

Shreya Maskar

जागा, चेहरे आणि आठवणींचा जलरंगी आविष्कार!

चित्रकार शैलेश मेश्राम यांच्या कलाकृतींचे मुंबईत प्रदर्शन

अप्रतिम 'जलरंग कलाकृती' पाहायला मिळणार

चित्रकार हा केवळ चित्र रेखाटत नाही, तर आपल्या कल्पना, भावना, अनुभव आणि आजूबाजूच्या जगाचे सौंदर्य रंग-रेषांच्या माध्यमातून मांडतो. चित्रकलेतून इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि मानवी भावविश्व जतन केले जाते. त्यामुळे समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीत चित्रकार आणि चित्रकलेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

आता मुंबईतील जहांगीर कलादालनात प्रसिद्ध चित्रकार शैलेश मेश्राम यांच्या ‘प्लेसेस अँड फेसेस’ या विशेष चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवासातील अनुभव, विविध ठिकाणे, माणसे आणि आठवणींना पाण्याच्या रंगांतून साकारलेल्या त्यांच्या कलाकृती या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत.

Shailesh Meshram 'Places and Faces' Art Exhibition

प्रसिद्ध चित्रकार शैलेश मेश्राम यांच्या 'प्लेसेस अँड फेसेस' (जागा आणि चेहरे) या विशेष चित्रप्रदर्शनाचे आयोजन मुंबईतील जहांगीर कलादालनाच्या गॅलरी क्रमांक ३ मध्ये करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कला रसिकांसाठी खुले राहणार आहे. प्रवासादरम्यान अनुभवलेली विविध ठिकाणे, भेटलेली माणसे आणि मनात घर करून राहिलेल्या आठवणी यांना शैलेश मेश्राम यांनी आपल्या चित्रांमधून कलात्मक रूप दिले आहे. त्यांच्या चित्रांची खासियत म्हणजे, जलरंगावरील प्रभुत्व, वास्तववादी मांडणी आणि अमूर्त शैली यांचा सुरेख मिलाफ त्यांच्या कलाकृतींमध्ये पाहायला मिळतो.

Shailesh Meshram 'Places and Faces' Art Exhibition

'प्लेसेस अँड फेसेस' या प्रदर्शनातील चित्रांमध्ये उजेड आणि सावलीचा प्रभावी खेळ विशेष लक्ष वेधून घेतो. जलरंगांमधून प्रकाशाची विविध रूपे आणि त्याची उधळण साकारण्याचे कौशल्य त्यांच्या चित्रांना वेगळी ओळख देते. जहाजे, समुद्र, जुन्या वास्तू आणि रस्त्यांपासून ते माणसांच्या चेहऱ्यांवरील विविध भावभावनांपर्यंत अनेक विषय त्यांनी आपल्या कलेतून जिवंत केले आहेत.

Shailesh Meshram 'Places and Faces' Art Exhibition

प्रवासातील अनुभव, परिसराचे सौंदर्य आणि मानवी भावविश्व यांचा कलात्मक आविष्कार पाहण्याची संधी या प्रदर्शनातून कला रसिकांना मिळणार आहे. कलेची आवड असणाऱ्यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन चित्रकार शैलेश मेश्राम यांनी केले आहे.

प्रदर्शनाची माहिती

  • चित्रकार : शैलेश मेश्राम

  • प्रदर्शनाचे नाव : प्लेसेस अँड फेसेस

  • ठिकाण : जहांगीर कलादालन, गॅलरी क्रमांक ३, मुंबई

  • कालावधी : ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT