Actress Passes Away: एमी पुरस्कार विजेती प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; वयाच्या ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actress Passes Away: अमेरिकन टीव्ही मालिकेतील प्रतिष्ठित अभिनेत्री लोरेटा स्विट यांचे ३० मे २०२५ रोजी न्यूयॉर्क शहरातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
Actress Passes Away
Actress Passes AwaySaam Tv
Published On

Actress Passes Away: अमेरिकन टीव्ही मालिकेतील प्रतिष्ठित अभिनेत्री लोरेटा स्विट यांचे ३० मे २०२५ रोजी न्यूयॉर्क शहरातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांचे वय ८७ होते. त्यांच्या टिमने त्यांच्या निधनाची माहिती दिली असून, वृद्धापकाळाने त्यांने निधन झाले असल्याचे सांगितले आहे.

लोरेटा स्विट यांनी १९७२ ते १९८३ या काळात CBS वाहिनीवरील 'M*A*S*H' या मालिकेत मेजर मार्गारेट "हॉट लिप्स" हुलिहान ही भूमिका साकारली होती. त्यांनी या भूमिकेसाठी दोन एमी पुरस्कार मिळवले आणि चार वेळा गोल्डन ग्लोबसाठी नामांकन मिळवले. मालिकेच्या एकूण २५१ भागांपैकी त्यांनी २४० हून अधिक भागांमध्ये काम केले आहे.

Actress Passes Away
Leonor Princess of Asturias: स्पॅनिश फुटबॉल स्टार गवीने नकारलेल्या स्पेनच्या राजकुमारीबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

लोरेटा स्विट यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३७ रोजी न्यू जर्सीमध्ये झाला. त्यांनी अमेरिकन अकादमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्समध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले आणि १९६० च्या दशकात टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. त्यांनी 'Mission: Impossible', 'Gunsmoke', आणि 'Hawaii Five-O' यांसारख्या मालिकांमध्येही काम केले. त्यांनी 'Same Time, Next Year' आणि 'Mame' यांसारख्या ब्रॉडवे नाटकांमध्येही भूमिका साकारल्या.

Actress Passes Away
Ahilyabai holkar : स्त्रीशक्तीचा होणार जागर; अहिल्यादेवींच्या जीवनातील प्रेरणादायी पैलू उलगडणार, नव्या सीरीजला सुरुवात

अभिनयाच्या क्षेत्राबरोबरच, स्विट प्राणी कल्याणासाठीही सक्रिय होत्या. त्यांनी 'SwitHeart Animal Alliance' ही संस्था स्थापन केली आणि 'SwitHeart' नावाचे पुस्तक प्रकाशित केले, ज्यामध्ये त्यांच्या जलरंग चित्रकला आणि प्राणी संरक्षणावरील कार्याचा समावेश आहे. त्यांनी १९८३ ते १९९५ या कालावधीत अभिनेता डेनिस होलाहानशी विवाह केला होता.लोरेटा स्विट यांच्या निधनामुळे टेलिव्हिजन आणि थिएटर क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अभिनयाने आणि सामाजिक कार्याने अनेकांना प्रेरणा दिली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com