anil jaisinghani granted bail of amruta fadnavis blackmailing case Saam TV
मुंबई/पुणे

Anil Jaisinghani: अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात अनिल जयसिंघानीला जामीन, पण सुटका नाहीच...

Anil Jaisinghani Bail: अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी वसुली प्रकरणात अटकेत असलेला क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याला जामीन मिळाला आहे.

Satish Daud

Anil Jaisinghani Bail: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी वसुली प्रकरणात अटकेत असलेला क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याला जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने सोमवारी 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्याच्या (१८ सप्टेंबर) अनिल जयसिंघानीला सशर्त जामीन मंजूर केला आहे.  (Latest Marathi News)

मात्र, अनिल जयसिंघानीवर आणखी दोन गंभीर गुन्हे असल्याने त्याची तुरुंगातून सुटका होणार नाही. अनिल जयसिंघानीने प्रत्येक सुनावणीला हजर राहावे, त्याचबरोबर साक्षीदारांना धमकावू नये, असे निर्देश देखील मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, यापूर्वी अनिल जयसिंघानी याची मुलगी आणि भाऊ यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.

कोण आहे अनिल जयसिंघानी?

अनिल जयसिंघानी हा बुकी असून तो फरार आरोपी देखील आहे. त्याच्यावर विविध ठिकाणी १५ गुन्हे दाखल आहेत. २० फेब्रुवारी रोजी अनिल जयसिंघानी याच्या मुलीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ब्लॅकमेल तसेच लाचेची ऑफर दिली होती. याशिवाय फोनवरुन धमकावले देखील होती.

यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल जयसिंघानी हा यामागील सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात जयसिंघानीला १६ मार्च रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली.

अनिल जयसिंघांनी याची मुलगी अनिक्षा फँशन डिझायनर आहे. नोव्हेंवर २०२१ मध्ये ती अमृता फडणवीस यांना भेटली होती. आपल्या आईचं निधन झालं असून मी सर्व कुटुंबाचा भार उचलते, अस म्हणत अनिक्षाने अमृता यांच्यासोबत जवळीक साधत मैत्री केली. त्यानंतर ती अमृता फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जात होती.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News :एसटी बसची दुचाकींना धडक, अपघातात १२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, तिघेजण जखमी

Mobile Care Tips : फोन पावसात भिजून बंद पडला? 'या' घरगुती टिप्स एकदा ट्राय कराच, खर्चही वाचेल

Nepal Protest : गृहमंत्री, पंतप्रधानांचा राजीनामा; नेपाळमध्ये सत्तापालट घडवून आणणारा ३६ वर्षीय तरुण कोण?

Gokul Milk: गोकुळ दूधसंघाच्या सभेत राडा; शोमिका महाडिक आक्रमक,पाहा VIDEO

Dombivali Crime : पुण्यात दुचाकी चोरी करून डोंबिवलीत चैन स्नॅचिंग; तीन सराईत चोरटे ताब्यात

SCROLL FOR NEXT