पुणे : शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी जन सन्मान यात्रेवरून अजित पवार गटावर टीका केली आहे. 'सध्या गुलाबी रंगाची पुंगी काढून जनता डोलते की काय? हे पाहण्यासाठी एक यात्रा निघाली आहे, असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
अजित पवार गटाने राज्यभरात जन सन्मान यात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार राज्यभरात महिलांशी संवाद साधणार आहे. या यात्रेदरम्यान अजित पवार गुलाबी रंगासारख्या जॅकेटमध्ये सर्वत्र दिसत आहेत. अजित पवारांच्या यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. दुसरीकडे शरद पवार गटानेही शिवराज्य यात्रेचा शुभांरभ केला आहे. या यात्रेची सुरुवात केल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, 'क्रांती दिनी आपण शिवस्वराज्य यात्रा काढण्यामागचे आणखी एक कारण आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली दरबारी गहाण ठेवणाऱ्या या सरकारला चले जाव म्हणण्याची हीच ती वेळ आहे. नागपंचमी आपण का साजरी करतो? याची सर्वांना कल्पना आहे. पण सध्या गुलाबी रंगाची पुंगी काढून जनता डोलते की काय? हे पाहण्यासाठी एक यात्रा निघालेली आहे. पण ही जनता स्वाभिमानी आहे. ती हे सगळं जाणून आहे'.
क्रेन पडण्याच्या घटनेवर बोलताना कोल्हे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना, क्रेन एका बाजूला झुकली. लगेच बातमी आली, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे थोडक्यात बचावले. ही तर एक महाराजांनी घेतलेली परीक्षा आहे. या आधी ही प्रत्येक मोठ्या आव्हानावेळी मी अशा परीक्षा दिल्यात. आता आजच्या प्रसंगामुळं शिवस्वराज्य यात्रेचे वादळ महाराष्ट्र भर पसरणार आहे'.
अमोल कोल्हेंनी जॅकेटवरून अजित पवारांवर निशाणा साधला. 'शिव स्वराज्य यात्रेच्या पहिल्याच सभेतून डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वात निघालेल्या यात्रेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचा फरक सांगितला. एखाद्या अॅड एजन्सीने एखादे जॅकेट घालून प्रचाराला पाठवलेलं आहे, असं म्हणत कोल्हेंनी अजित पवारांवर टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.