Amol Kolhe News : एनडीएच्या घटक पक्षांची साथ इंडिया आघाडीला मिळणार; अमोल कोल्हे यांचा दावा

Junnar Pune news : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशात इंडिया आघाडीला मिळालेल्या यशामुळे दिल्लीतल्या घडमोडींना वेग आला आहे
Amol Kolhe
Amol KolheSaam tv

जुन्नर (पुणे) : एनडीएच्या जागांची संख्या आज मोठी दिसत असली तरी यातील अनेक जण मनाने सोबत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे एनडीएतील घटक पक्ष इंडिया आघाडीसोबत येणार असल्याचा मोठा दावा खासदार अमोल कोल्हे यांनी आज 'साम'शी बोलताना केला आहे.  

Amol Kolhe
Kolhapur News : पाण्यासाठी नागरिकांनी अडवला रस्ता; कोल्हापूरच्या वारे वसाहत परिसरात पाण्याच्या समस्येने नागरिक हैराण

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशात इंडिया आघाडीला (India Aghadi) मिळालेल्या यशामुळे दिल्लीतल्या घडमोडींना वेग आला आहे. एनडीए व इंडिया आघाडीच्या दिल्लीत बैठक होत असून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्या अनुषंगाने निवडून आलेले शरद पवार गटाचे खासदार (Amol Kolhe) अमोल कोल्हे यांनी एनडीएतील घटक पक्ष इंडिया आघाडीसोबत येतील असा दावा केला आहे. 

Amol Kolhe
Shirur Accident : पुणे- नाशिक महामार्गावर दोन विचित्र अपघात; गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एकाचा मृत्यू

माविआचे खासदार जाणार दिल्लीला 

दिल्लीतल्या घडमोडींना वेग आला असुन (Sharad Pawar) शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे दिल्लीत दाखल झाल्या आहेत. तसेच महाविकास आघाडीचे खासदारही दिल्लीला रवाना होणार असुन शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण हि रणनिती रहाणार असल्याचे कोल्हेंनी स्पष्ट केले. तसेच दिल्लीत काही तासांत घडामोडी घडणार असल्याचे संकेत देखील कोल्हे यांनी दिले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com