Amit Shah-Chandrakant Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Amit Shah Upset News: निवडणुकीच्या तोंडावर अशी विधाने खपवून घेतली जाणार नाही, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अमित शहा नाराज

Political News : केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर बोलण्यावर भर द्या, असं अमित शाह यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

Political News : अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचा मोठा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला होता. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला होता.  चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, अशा शब्दात अमित शाह यांनी भाजप नेत्ंयाना खडसावलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वादग्रस्त विधाने करण्यापेक्षा केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर बोलण्यावर भर द्या, अशी ताकीद अमित शाह यांची भाजप नेत्यांना दिली आहे.

चंद्रकांत पाटलांचा स्पष्टीकरण

 बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. 'बाबरी'चा ढाचा पाडताना विश्व हिंदू परिषदेचा बॅनर होता. मला कुणाचा अनादर करायचा नव्हता. माझ्या वक्तव्याचा विपर्यास यापूर्वीही अनेकदा केला गेला. राजकीय हेतूने वाद निर्माण करतात. बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आदर आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर काही बोलणार नाही, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. (Political News)

बाबरी मशिदी संदर्भात मांडलेली भूमिका त्यांची व्‍यक्‍तीगत- बावनकुळे

चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदी संदर्भात मांडलेली भूमिका त्यांची व्‍यक्‍तीगत असेल, परंतु ती पक्षाची भुमिका नसल्‍याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज स्‍पष्‍ट केलं आहे. रामजन्म भूमीचं आंदोलन हा एक मोठा विचार होता. बाळासाहेब ठाकरे यांचे या आंदोलनाला समर्थन होत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक त्याठिकाणी नव्हते; अस म्हणणं चुकीचे आहे, असंही बावनकुळे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला सुरुवात

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट! पोलिसांनी ताब्यात घेतला महत्त्वाचा पुरावा

'अमृत भारत' एक्सप्रेसचा नवा मार्ग, दिवळीसाठी मुंबईतून सुटणार २४ विशेष रेल्वे, जाणून घ्या बुकिंग अन् थांब्यांची माहिती

Guava Benefits For Diabetes And Cholesterol: दररोज पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलवर काय परिणाम होतो?

Tiger Shroff : टायगर श्रॉफची प्रकृती चिंताजनक? व्हायरल फोटो पाहून चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT