ambernath , ambernath muncipal council, ambernath palika , election 2022 , reservation
ambernath , ambernath muncipal council, ambernath palika , election 2022 , reservation saam tv
मुंबई/पुणे

Ambernath Nagar Parishad : अंबरनाथ पालिका आरक्षण जाहीर; एक ऑगस्टपर्यंत नाेंदवा हरकती

अजय दुधाणे

अंबरनाथ : ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय आल्यानंतर अंबरनाथ (ambernath) पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज (गुरुवार) ओबीसी आरक्षण (OBC Reservation) सोडत काढण्यात आली. यामध्ये ५९ प्रभागांपैकी १४ प्रभाग ओबीसींसाठी (obc) आरक्षित झाले. (Ambernath News)

अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका मार्च २०२० मध्ये होणं अपेक्षित होतं. मात्र कोरोनामुळे गेल्या २ वर्षांपासून निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानं प्रलंबित निवडणुका तातडीनं घेण्याचे आदेश दिल्यानंतर १३ जून २०२२ रोजी अंबरनाथ पालिकेनं अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षण सोडत काढली होती. ज्यामध्ये अनुसूचित जातींसाठी ८, तर अनुसूचित जमातींसाठी २ जागा आरक्षित झाल्या होत्या.

५९ पैकी १४ जागांवर ओबीसी आरक्षण

त्यावेळी ओबीसी आरक्षण नसल्यानं उर्वरित सर्व ४९ जागा या खुल्या प्रवर्गासाठी शिल्लक राहिल्या होत्या. मात्र ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर ५९ पैकी १४ जागांवर ओबीसी आरक्षण लागू करण्यात आलं. त्यामुळं आधीच्या अनुसूचित जाती जमातींच्या राखीव जागा वगळून उर्वरित ४९ पैकी १४ जागा लॉटरी पद्धतीने ओबीसींसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यापैकी ७ जागा या ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. उर्वरित ३५ जागा या खुल्या प्रवर्गासाठी असून त्यापैकी १८ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.

आज ठाण्याचे भूमापन उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांच्या उपस्थितीत अंबरनाथ नगरपालिका सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रशांत शेळके हेदेखील उपस्थित होते. तर अंबरनाथ शहरातील इच्छुक उमेदवारही यावेळी उपस्थित होते.

दरम्यान सर्वसाधारण प्रवर्गातील १८ जागा या महिलांसाठी यापूर्वीच आरक्षित करण्यात आल्या असून त्यामुळे आता अंबरनाथ पालिकेतील आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या आरक्षण सोडतीवर काही हरकती एक ऑगस्टपर्यंत नोंदवता येणार आहेत असे रोहित कुमार प्रजापती (उपजिल्हाधिकारी, भूमापन, ठाणे) यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी मला राजकारणात आणले, शिवसेना नेते तानाजी सावंत यांचं वक्तव्य

UP Accident CCTV: ई-रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणाने घेतला तरुणाचा जीव, अपघाताचा धक्कादायक CCTV व्हिडीओ व्हायरल

Today's Marathi News Live: जाहीर सभेत आमदार शहाजी बापू पाटलांची मतदारांना दमबाजी

Aaditya Thackeray Speech : 'कोल्हापुरात किती दिवस ठाण मांडणार?'; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेना खोचक सवाल

Unnao Accident: उन्नावमध्ये बस -ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT