Satara : गोडोली तळे परिसरात धर्मवीर संभाजीराजेंचा पुतळा बसविला जाणार : वृषालीराजे

सातारा ही छत्रपतींची चाैथी राजधानी आहे.
Satara, dharmaveer sambhaji maharaj , Vrushaliraje Bhosale
Satara, dharmaveer sambhaji maharaj , Vrushaliraje Bhosale saam tv

सातारा : गोडोली तळे परिसरात धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (dharmaveer sambhaji maharaj) यांचा पुतळा (Statue) बसवण्याची मागणी शाहुगरी फौंडेशनच्यावतीने सातारा (satara) पालिकेस करण्यात आली होती. त्यास सातारा पालिकेने मंजुरी दिली असून हा विषय धोरणात्मक असल्याने जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती शाहुनगरी फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वृषालीराजे भोसले (Vrushaliraje Bhosale) यांनी दिली. (vrushaliraje bhosale news)

वृषालीराजे म्हणाल्या सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी आहे. या शहरामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचे वंशज वास्तव्यास आहेत. ऐतिहासिक शहर असलेल्या साता-यामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे परंतु स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा तसेच स्मारक अद्याप कुठेही नाही हे क्लेशदायक आहे. स्वराज्याचे रक्षण करणा-या छत्रपतींचे स्मारक साता-यात व्हावे ही शिवभक्तांची अनेक वर्षांपासून मागणी होती.

Satara, dharmaveer sambhaji maharaj , Vrushaliraje Bhosale
Saam Impact : कोयना जलाशयातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार; जिल्हाधिकारी, ग्रामस्थ बैठकीस यश

धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शाहुनगरी फौंडेशनच्यावतीने पालिकेकडे गोडोली तळयाचे परिसरात प्रवेशव्दाराजवळ त्यांच्या कर्तृत्वास शोभेल असा पुतळा अथवा स्मारक उभारण्यात यावे यासाठी योग्य त्या मार्गदर्शक व्यक्तींचा सल्ला घेऊन त्वरित प्रशासकीय कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली होती.

पालिकेने शाहूनगरी फाउंडेशनच्या मागणीची दखल घेऊन पुतळा बसवण्यासंदर्भात शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेणे आवश्यक असल्याने जिल्हास्तरीय समितीकडे मान्यता घेण्यासाठी पालिकेने मंजुरी दिली आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि पालिका प्रशासनाने तत्परतेने मागणीचा विचार केल्याने शाहूनगरी फाउंडेशनच्यावतीने आणि सातारकरांच्यावतीने आभार मानत असल्याचे वृषालीराजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Satara, dharmaveer sambhaji maharaj , Vrushaliraje Bhosale
Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धेतील माघारी नंतर नीरज चोप्रा झाला भावूक; देशवासियांना लिहिलं पत्र
Satara, dharmaveer sambhaji maharaj , Vrushaliraje Bhosale
राखी सावंतच्या 'त्या' कृतीवर नेटीझन्स भडकले, मुंबई पाेलिसांकडं कारवाईची मागणी; नेमकं काय घडलं (व्हिडिओ पाहा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com