नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Common Wealth Games 2022) मी देशाचे (india) प्रतिनिधित्व करू शकणार नाही हे तुम्हा सर्वांना कळवताना मला वाईट वाटत आहे. हे सांगताना देखील खूप निराशजनक असल्याचं भालाफेकपटू नीरज चाेप्रानं (neeraj chopra) ट्विट (tweet) करुन नमूद केले आहे. दुखापतीमुळं आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नीरज चाेप्रा याने मंगळवारी माघार घेतल्याचे इंडियन ऑलिंम्पिक संघटनेस कळविलं हाेते. त्यानंतर त्याने देशवासियांना लिहिलेलं एक पत्र ट्विट केलं आहे. (Neeraj Chopra Latest Marathi News)
जागतिक ऍथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम फेरीनंतर नीरज चाेप्रा यास दुखापत झाली. या स्पर्धेत राैप्य पदकाची कमाई केली हाेती. दरम्यान या दुखापतीमुळं त्याने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतल्याचे मंगळवारी कळविले. इंडियन ऑलिंम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली.
नीरज चोप्रानं देशवासियांना लिहिलेल्या पत्रात बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मी देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही हे तुम्हा सर्वांना सांगताना मी अत्यंत निराश झालाे आहे. जागतिक चॅम्पियनशिपमधील माझ्या चौथ्या थ्रोदरम्यान माझ्या मांडी शिरा दुखावल्या गेल्या. त्यानंतर मला अस्वस्थ वाटू लागले होते. काल (मंगळवारी) अमेरिकेतील वैद्यकीय अधिकारी यांच्या एका पथकाने वैद्यकीय तपासणी केली. त्यात एक किरकोळ ताण आढळून आला आणि मला पुढील काही आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नीरजनं हे पत्र ट्विट केले आहे.
नीरजनं मी माझ्या सपोर्ट टीम आणि (10A), (AFI) आणि (SAI CAIMS) यांच्या समवेत चर्चा केली. माझे पुढील उद्दिष्टं लक्षात घेता सध्या काेणताही धाेका पत्करु नये असं मत पुढं आले. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियात झालेल्या (CWG 2018) स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकले होते. आपल्या या यशास पुन्हा गवसणी घालण्याची संधी हुकल्यानं मी दुखी झाल्याचे त्याने म्हटलं आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणे हा खूप माेठा सन्मान असताे ताे मी गमावला आहे.
उद्घाटन समारंभात टीम इंडियाचा ध्वजवाहक होण्याची संधी गमावल्याबद्दल मी विशेषतः निराश झालो आहे. सध्या, मी दुखापतीतून बाहेर येण्यासाठी लक्ष केंद्रित करीत आहे आणि लवकरच मैदान उतरण्यासाठी प्रयत्न करीन असेही नीरजनं म्हटलं आहे. मला अनेक दिवसांपासून तुमच्याकडून मिळालले प्रेम आणि पाठबळामुळे मी संपूर्ण देशाचे आभार मानू इच्छितो आणि आपणी सर्वांनी मिळून या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशवासियांना पाठबळ देऊ असे आवाहन नीरजनं केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.