Satara : नरबळी प्रकरण; भाेंदूबाबांच्या टाेळीस चाप लावा : अंनिसची मागणी

जसं बकासुर टोळीवर कार्यवाही केली त्याच प्रमाणे भाेंदूबाबांच्या मुसक्या आवळा अशी मागणी अंनिसच्या समितीने पाेलीसांना केली आहे.
Satara , Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti , Dr. Hamid Dabholkar
Satara , Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti , Dr. Hamid Dabholkar saam tv
Published On

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील ढेबेवाडी विभागातील करपेवाडी (ता. पाटण) येथील भाग्यश्री माने (bhagyashree mane) या महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू हा नरबळी असल्याचे पोलीस (police) तपासात पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस दलाने चिकाटीने या प्रकरणाचा तपास लावला. पाेलिसांचे अभिनंदन करत जादूटोणा विरोधी कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून पोलीस मुख्यालयात जिल्हा नोडल अधिकारी नेमावा अशी मागणी महाराष्ट्र (maharashtra) अंनिस (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) मार्फत राज्य कार्यकरी समिती सदस्य डॉ हमीद दाभोलकर (Hamid Dabholkar) आणि प्रशांत पोतदार यांनी केली आहे. (satara Latest Marathi News)

करपेवाडी प्रकरणातील संशयित हे म्हैसाळ प्रकरणातील मांत्रिकांच्या संपर्कात असल्याच्यामधून या तपासात पुन्हा गती आली. सातारा (Satara), सांगली (Sangli), सोलापूर (Solapur) या भागात गुप्तधनशोध आणि पैशाचा पाऊस पडण्याचे आमिष अशा गोष्टींच्या माधमातून लोकांना फसवणाऱ्या भोंदूबुवांच्या टोळ्या कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे अशा अनेक तक्रारी येत असून संघटीतपणे काम करणाऱ्या ह्या भोंदू बाबाबुवांच्या मुसक्या पोलीस दलाने जशा बकासुर टोळीवर कार्यवाही केली त्याच प्रमाणे आवळाव्या अशी मागणी समितीने केली आहे.

Satara , Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti , Dr. Hamid Dabholkar
Satara : 'बारामतीकरांचे राज्य आता संपलं आहे, हे ध्यानात घ्या अन् नीट वागा'

जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत असलेली दक्षता अधिकारी हि तरतूद प्रभावी पद्धतीने कार्यान्वित करण्याची गरज ह्या निमित्ताने अधोरेखित होत आहे . कायद्यामधील या तरतुदी नुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात सिनियर पोलीस अधिकारी हे दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत असतात.

Satara , Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti , Dr. Hamid Dabholkar
पाचगणी जवळच्या डाेंगरास पडल्या भेगा; ब्लूमिंगडेल स्कूलचे विद्यार्थी सुरक्षितस्थळी रवाना

या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाबाबुवांच्या ठिकाणी जावून चौकशी करणे आणि गरज पडल्यास साहित्य जप्त करण्याचे देखील त्यांना अधिकार आहेत. या सारख्या प्रकरणा विषयी विषयी जागरूक नागरिकांनी वेळीच तक्रार केली आणि दक्षता अधिका-यांनी त्यांची दाखल घेतली असती तर अशा घटना टाळता येवू शकतात सांगलीत पैशाचा पाऊस पडण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याची देखील एक घटना नुकतीच पुढे आली आहे. याा सगळ्या घटना लक्षात घेता सातारा जिल्ह्यातील दक्षता अधिकाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा हि तातडीने आयोजित करून ती यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी देखील या वेळी त्यांनी केली.

Satara , Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti , Dr. Hamid Dabholkar
Udayanraje Bhosale : मला नाही वाटत माझं रेकाॅर्ड काेण ताेडेल : उदयनराजे भाेसले (व्हिडिओ पाहा)

पाटण भागात स्थानिक देवृष्यांचे मोठ्या प्रमाणत प्रस्थ असून त्या विषयी महाराष्ट्र अंनिसने वेळोवेळी आवाज उठवला आहे. करपेवाडी प्रकरणात देखील स्थानिक देवृष्यांचा सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इथून पुढे असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी पाटण ढेबेवाडी परिसरातील देवृष्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

Satara , Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti , Dr. Hamid Dabholkar
Karnataka : पत्नीस उत्पन्नाचे साधन समजणे ही क्रूरता : कर्नाटक उच्च न्यायालय

समाजातील अनेक सुशिक्षित लोक देखील अंधश्रद्धा ना बळी पडत असल्याने सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा या विषयी समाजात प्रबोधन करण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित होत आहे. साधन कुटुंबातील व्यक्ती देखील पैश्या च्या हव्यासातून नोटा दामदुपट करणे, उल्कापातातून झालेल्या धातूचे यंत्र नासाला विकून मालामाल होणे, पैशाचा पाऊस गुप्तधन अशा हव्यासाला बळी पडताना दिसत आहेत. अशा प्रकारे कोणाचेही पैसे दामदुप्पट होऊ शकत नाहीत .अशा भूलथापाना लोकांनी बळी पडू नये. अशा स्वरूपाच्या गुप्तधनाच्या दाव्या वर विश्वास ठेवणे आणि सातत्याने त्याच्या मागे धावणे या पाठीमागे मानसिक अस्वस्थतेची लक्षणे असू शकतात त्या मुळे गरज पडल्यास अशा व्यक्तीला बरे करण्या साठी कुटुंबीयांनी मानसोपचाराची मदत घ्यावी असे देखील डॉ हमीद दाभोलकर यांनी नमूद केले.

Satara , Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti , Dr. Hamid Dabholkar
जादूटोणा हत्याकांड : नात्याला काळीमा! आजीनेच केली नातीची हत्या

करपेवाडी ग्रामपंचायतीच्या सोबत अंधश्रद्धा निर्मुलन या विषयी प्रबोधन कार्यक्रम करणार असल्याचे देखील महाराष्ट्र अंनिस मार्फत सुकुमार मंडपे, प्रा प्रमोदिनी मंडपे, वंदना माने, हौसेराव धुमाळ, डॉ दीपक माने, भगवान रणदिवे यांनी जाहीर केले आहे

Edited By : Siddharth Latkar

Satara , Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti , Dr. Hamid Dabholkar
Monty Norman : जेम्स बाॅण्ड थीमचे संगीतकार मॉन्टी नॉर्मन यांचं निधन (व्हिडिओ पाहा)
Satara , Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti , Dr. Hamid Dabholkar
शेतक-यांनाे! नऊ पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश; जुलै अखेर करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com