सातारा : सातारा (satara) जिल्ह्यात विशेषत: महाबळेश्वर (mahableshwar) आणि पाचगणी (panchgani) येथे दरवर्षी माेठ्या प्रमाणात पाऊस पडत असताे. यंदा देखील महाबळेश्वर तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. दरम्यान पावसामुळे पाचगणी शहरानजीकच्या दांडेघर या परिसरातील डोंगरास सुमारास दाेन फुटांच्या भेगा पडल्या आहेत परिणामी या डोंगरा नजीकच्या असणा-या एका शाळेतील विद्यार्थ्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असा आदेश स्थानिक प्रशासनाने दिला हाेता. दरम्यान ब्लूमिंगडेल स्कूलमधील सर्व विद्यार्थी एका हाॅटेलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहेत अशी माहिती तहसिलदार सुषमा पाटील - चाैधरी यांनी दिली. तसेच आज (गुरुवार) वरिष्ठ अधिकारी यांनी शाळा आणि परिसराची पाहणी केल्याचे तहसिलदारांनी नमूद केले. (Dandeghar Latest Marathi News)
पाचगणी शहरानजीक दांडेघर हे गाव आहे. या गावाच्या नजीक असलेल्या डाेंगारवर सततच्या पावसामुळे भेगा पडल्या आहेत. याबाबतची माहिती प्रशासनास मिळाल्यानंतर स्थानिक अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट दिली.
त्यानंतर घटनास्थळ धाेकादायक झाल्याचे संबंधित अधिकारी आणि कर्मचा-यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी नजीकच्या शाळा व्यवस्थापनास विद्यार्थी व महत्वाचे साहित्य सुरक्षितस्थळी असू द्या असे निर्देश दिले.
दरम्यान गेल्या वर्षीच्या 22 आणि 23 जूलैस अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यासह महाबळेश्वर, वाई तालुक्यात माेठ्या प्रमाणात भूस्खलन झाले हाेेते. दरडी काेसळल्या हाेत्या. त्यामुळे नागरिकांचे जीव गेले हाेते. गतवर्षीचा अनुभव लक्षात प्रशासनाने दांडेघर येथील सध्याची घटना गांभीर्याने घेतल्याचे जाणवते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.