Satara Crime News : साताऱ्यात दहशत माजविणाऱ्या बकासूर गँगचे सात युवक तडीपार

पाेलीसांनी कठाेर पाऊल उचललं आहे.
satara , satara police
satara , satara policesaam tv
Published On

सातारा : सातारा (satara) पाेलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सातारा शहरातील सात युवकांना (youth) एका वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. हे सर्व युवक 18 ते 25 वयाेगटातील आहेत. बकासूर गॅंग म्हणून स्वत:च्या टाेळीचे त्यांनी नामकरण केले हाेते. शहर व परिसरात ही टाेळी दहशत माजवत हाेती. त्यामुळे पाेलीस (police) दलाने या युवकांवर कठाेर कारवाई केली आहे. (satara latest marathi news)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शाहुपुरी, सातारा शहर, सातारा तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगुन दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, गंभीर दुखापत करणे, अनाधिकाराने प्रवेश करुन मारहाण करणे, अवेद्य शस्त्रांचा वापर करुन धमकावणे, गर्दी मारामारी करणे अवैद्य मटका जुगार चालविणे असे शरीराविरुध्दचे व मालमत्ते विरुध्दचे गंभीर गुन्हे संबंधित टोळीवर दाखल हाेते. या टोळीतील लोकांना वेळोवेळी सुधारणेची संधी देवुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधुन त्यांचेवर कडक कारवाई करणे करीता मागणी होत होती. त्यामुळे त्यांचे कडुन सातारा जिल्हा हद्दीत हिंसक घटना घडुन भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवु नये म्हणुन त्यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.

satara , satara police
विसरू नका, मी काय कांड केले माहितीहेत ना ! सेनेच्या महिला संघटकाचा एकनाथ शिंदे गटास इशारा

या टाेळीचा प्रमुख यश नरेश जांभळे (वय२१) तसेच सदस्य आदित्य जयेंद्र गोसावी (वय २१), विशाल राजेंद्र सावंत (वय २०) , साहील जमीर जमादार (वय २१), ऋतिक ऊर्फ विजय विनोद कांबळे (वय २३), प्रज्वल प्रविण गायकवाड (वय २४) शिवम संतोष पुरीगोसावी (वय १८) यांना एक वर्ष जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या टाेळीबाबतचा तडीपारीचा प्रस्ताव सातारा शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक बी.बी. निंबाळकर यांनी एसपी बन्सल यांना सादर केला होता.

Edited By : Siddharth Latkar

satara , satara police
Satara : मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करा; साता-यात विशेष माेहिम
satara , satara police
Satara : नटराज मंदिर परिसरात अर्जुन यादवचा गेम करणारे मुख्य सूत्रधार अटकेत; एलसीबीची कारवाई
satara , satara police
Udayanraje Bhosale : मला नाही वाटत माझं रेकाॅर्ड काेण ताेडेल : उदयनराजे भाेसले (व्हिडिओ पाहा)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com