Satara : नटराज मंदिर परिसरात अर्जुन यादवचा गेम करणारे मुख्य सूत्रधार अटकेत; एलसीबीची कारवाई

सातारा पाेलीसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्याने तसेच सर्व संशयित आराेपींना अटक केल्याने पाेलीस दलाचे काैतुक हाेऊ लागले आहे.
arjun yadav, wai, satara, pune, instagram, mumbai
arjun yadav, wai, satara, pune, instagram, mumbaisaam tv news

सातारा : साता-यातील (Satara) बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आठवड्यापुर्वी गाेळीबारात वाईतील (Wai) अर्जुन यादव (Arjun Yadav) याचा मृत्यू झाला हाेता. या प्रकरणी सातारा पाेलीस दलाच्या (satara police) एलसीबीने (LCB) मुख्य सूत्रधाराससह एकास मुंबईतून (mumbai) अटक केली आहे. या प्रकरणात आता एकूण पाच जणांना अटक केल्याची माहिती एसपी कार्यालयातून देण्यात आली. (arjun yadav latest marathi news)

वाईतील सिद्धनाथवाडीमधील अर्जुन मोहन यादव याच्यावर नटराज मंदिर (Natraj Mandir Satara) येथे गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यास भरदिवसा मारल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पाेलीसांचे पथक विविध ठिकाणी तपासासाठी रवाना झाले हाेते.

arjun yadav, wai, satara, pune, instagram, mumbai
Eknath Shinde : केंद्राच्या पहिल्याच बैठकीत भुमीपुत्रानं घेतला साताऱ्यासाठी महत्वपुर्ण निर्णय

याप्रकरणी एलसीबीने चार जूलैस तीन युवकांना अटक केली हाेती. त्यानंतर एलसीबीने या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना सात जूलैस (गुरुवार) मुंबईत अटक केली. त्याच्या समवेत आणखी एकास अटक केल्याची माहिती पाेलीस मुख्यालयातून देण्यात आली.

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार अर्जुन याने काही महिन्यापूर्वी वाईत गोळीबार केला. त्याच्या वाढदिवसादिवशी भैय्या या युवकाने घरासमोर फटाके वाजवले होते. तेव्हापासून अटकेतील तीन संशयित व इतर दोन युवक अर्जुनला गाठण्याच्या प्रयत्नात होते. शनिवारी त्यांनी अर्जुनवर साता-यात गाेळीबार केला. त्यात अर्जुनचा मृत्यू झाला.

मुख्य सूत्रधार अटकेत

या प्रकरणी पाच संशयित आराेपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अभिजीत उर्फ भैय्या शिवाजी माेरे (गंगापूरी, वाई), साेमनाथ बंडू शिंदे (रविवार पेठ, वाई) या दाेघांना मानखूर्द मुंबई येथून अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

arjun yadav, wai, satara, pune, instagram, mumbai
Bakri Eid 2022 : चर्चा तर हाेणारच ! बक-याच्या कपाळावर अर्धचंद्रकोर; बाजारात खाताेय भाव (व्हिडिओ पाहा)
arjun yadav, wai, satara, pune, instagram, mumbai
वाईतील अर्जुन यादवचा साता-यात गेम करणारे तिघे ताब्यात; एलसीबीची कारवाई
arjun yadav, wai, satara, pune, instagram, mumbai
Shivsena : शिंदे-भाजप सरकारला खिंडीत पकडण्यासाठी शिवसेनेने रचला आणखी एक डाव

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com