नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात (maharashtra) सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे (eknath shinde) हे मुख्यमंत्री आहेत तर देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) उपमुख्यमंत्री. शिंदे गटाने भाजपच्या (bjp) मदतीने स्थापन केलेल्या सरकारनं नुकताच सभागृहात विश्वास दर्शक ठराव जिंकला. दरम्यान या सर्व घडामाेडींना आता शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा न्यायालयीन लढाईस शिंदे गटास सामाेरे जावे लागणार आहे. आज (शुक्रवार) शिवसेनेने (Shivsena) पुन्हा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) शिंदे गटास थाेपविण्यासाठी एक याचिका दाखल केली आहे. (maharashtra political latest marathi news)
शिवसेनेच्या बंडखोर साेळा आमदारांवर पक्षाकडून कारवाई झाली होती. या साेळा जणांना अपात्र करण्यात आले हाेते. या निर्णयाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठाेठावले हाेते. न्यायालयाने संबंधित याचिकेवर निर्णय देताना सुनावणी अकरा जुलैपर्यंत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते.
दरम्यानच्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे-फडणवीस यांना सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यापाठाेपाठ फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यापालांच्या या निर्णयावर देखील शिवसेनेनी आजच्या याचिकेत आक्षेप नाेंदविला आहे.
आज दाखल करण्यात आलेल्या याचिकेत शिवसेनेने राज्यपालांची भूमिका व विधानसभा अध्यक्षांची निवड चुकीची आहे असे म्हटलं आहे. तीन आणि चार जुलैला सभागृह याेग्य पद्धतीने चालवलं गेलं नाही, विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे असे आक्षेप नाेंदविले आहे.
दरम्यान आज झालेल्या याचिकेवर 11 जूलैला सुनावणी घेतली जाईल असे खंडपीठाने नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.