रत्नागिरी : काेकणातील (kokan) जनता शिवसेनेच्या (shivsena) पाठीशी खंबीरपणे आहे. आजपर्यंत किती आले आणि किती गेले आमचा हा अभेद्य किल्ला, अभेद्य गड शिवसेना राखणार असा विश्वास आमदार राजन साळवी (rajan salvi) यांनी येथे (ratnagiri) आज (गुरुवार) माध्यमांशी बाेलताना व्यक्त केले. (Shiv Sena Latest Marathi News)
शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी हे महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर रत्नागिरीत परतले. कोकणातील तीन आमदार एकनाथ शिंदे (eknath shinde) गटात सामील झाले आहेत. शिवसेना हा कोकणचा बालेकिल्ला आहे. शिवसैनिक हे शिवसेनेतच आहेत. काही जण सेनेत आले होते. त्यांना शिवसेनेने निवडून दिले. जे गेलेत त्या आमदारांना आम्ही जा सांगितलं नव्हतं ते स्वत: गेले आहेत. दिल्या घरी सुखी रहा असा सल्ला आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांना दिला आहे. (Eknath Shinde Latest News Update)
दरम्यान काेकणचा किल्ला शिवसैनिक अभेद्य राखणार असे सांगताना आमदार राजन साळवी म्हणाले नारायण राणे (narayan rane) हे शिवसेना साेडून गेले. त्यावेळी देखील आम्ही हेच म्हणालाे हाेताे शिवसेनेला काही फरक पडत नाही. त्यानंतर वैभव नाईक यांना राणेंना पराभूत केले. काेकणची जनता शिवसेनेच्या पाठीशी खंबीर असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हांला घडवलं म्हणून आम्ही घडलाे असेही साळवींनी नमूद केले. (Narayan Rane News Update)
दरम्यान येत्या नऊ जुलैला आमदार राजन साळवी यांचा वाढदिवस आहे. त्यांचा आजपासून राजापूर मतदारसंघाचा झंझावती दौरा सुरु आहे. असे असले तरी अनपेक्षितपणे शिवसेनेमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे आमदार साळवी यंदा वाढदिवस साजरा करणार नसल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.