Ambernath Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Crime: अंबरनाथमध्ये कोयता गँगचा थरार, ९ जणांकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Ambernath Crime: अंबरनाथमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली. ९ जणांच्या टोळीने तरुणावर कोयता आणि तलवारीने सपासप वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

Summary -

  • अंबरनाथमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली

  • कोयता आणि तलवारीने तरुणावर वार करण्यात आले

  • ९ जणांच्या टोळीने तरुणावर हल्ला केला

  • या हल्लात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

  • हल्ल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल होत आहे

अजय दुधाणे, अंबरनाथ

अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा गुंडगिरीचे साम्राज्य डोकं वर काढताना दिसत आहे. जावसई परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास एका तरुणावर ८ ते ९ जणांच्या टोळीने तलवार–कोयत्यांसारख्या धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अंबरनाथच्या फुलेनगर वाडीमध्ये सुधीर ओमप्रकाश सिंह हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि या परिसरात त्याचा तबेलाही आहे. गाडीच्या तुटलेल्या पार्टचे वेल्डिंगचे काम करण्यासाठी तो घराजवळील गॅरेजवर गेला असताना अचानक मोटरसायकलवरून आलेल्या ९ तरुणांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. आरोपींकडे तलवार, कोयता यासारखी घातक हत्यारे होती आणि त्यांनी थेट जीव घेण्याच्या उद्देशाने सुधीरला मारहाण करत कोयता-तलवारीने हल्ला केला.

या हल्ल्यात सुधीर सिंह यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हल्लेखोरांनी पळ काढताना सुधीरची मोटरसायकलची सुद्धा तोडफोड केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोरांच्या टोळीचा शोध सुरू केला आहे. शहरातील वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेच्या नियमात मोठे बदल; कोणाला मिळतो योजनेचा लाभ?

Maharashtra Live News Update: विक्रोळीध्ये चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू; उपचार नाकारल्याचा आरोप करत हॉस्पिटलला घेराव

गायिका अंजली भारतीला दणका; अमृता फडणवीसांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार, राज्य महिला आयोगाकडून कारवाईसाठी पहिलं पाऊल

Anjali Bharati: अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारी अंजली भारती कोण आहे?

Dry Fruit Laddu Recipe: संध्याकाळी काम करताना लागलेल्या भूकेसाठी बनवा साखरे नसलेला टेस्टी आणि हेल्दी ड्राय फ्रूट लाडू

SCROLL FOR NEXT