Rain : परतीच्या पावसाचा फटका; कल्याण, अंबरनाथ, मुरबाड तालुक्यात १०० टक्के भात शेती वाया

Ambarnath News : सततच्या पावसामुळे शेती पिकांचे अगोदरच मोठे नुकसान झाले आहे. यानंतर थोडी उघडीप मिळाल्याने पीक काढणीला वेग आला होता. मात्र आता पुन्हा एकदा परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे नुकसान
Rain
Rain Saam tv
Published On

मयुरेश कडव
अंबरनाथ
: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे या चारही तालुक्यातील जवळपास १०० टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या पाऊस सुरु आहे. मागील महिन्यापर्यंत सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे शेती पिकांचे अगोदरच मोठे नुकसान झाले आहे. यानंतर थोडी उघडीप मिळाल्याने पीक काढणीला वेग आला होता. मात्र आता पुन्हा एकदा परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आता अंबरनाथ, कल्याण, मुरबाड व शहापूर तालुक्यात परतीच्या पावसाचा भातशेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. 

Rain
Shegaon Crime : आठवडे बाजाराच्या गर्दीत गाठत युवकाची हत्या; खळबळजनक घटनेने शेगाव हादरले

१०० टक्के भात शेतीचे नुकसान 

ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभर पडलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन भात लागवडी खाली आहे. यातील जवळपास १०० टक्के शेतीचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने भात पिकाला झोडपून काढले असून वादळी वाऱ्यामुळे शेतातील उभे पीक आडवे झाले आहे. यात मोठे नुकसान होत असून शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. 

Rain
Accident News : रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने उडविले; येवल्यात वाहतूक व्यवस्थेचा बळी

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

दरम्यान दोन दिवस झाले जोरदार पाऊस पडत असल्याने भात पीक असलेल्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले असून शेतकरी राजा संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत दुबार पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com