Shegaon Crime
Shegaon CrimeSaam tv

Shegaon Crime : आठवडे बाजाराच्या गर्दीत गाठत युवकाची हत्या; खळबळजनक घटनेने शेगाव हादरले

Buldhana News : जुन्या वादामुळेच ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. पोलिसांनी साक्षीदारांची माहिती घेण्यास सुरुवात केली असून घटनेनंतर आठवडे बाजारात गर्दी झाली
Published on

बुलढाणा : आठवडे बाजाराच्या गर्दीत गाठून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना शेगाव मध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शेगाव शहरात खळबळ उडाली असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून आरोपीचा शोध पोलिसांकडून शोध सुरु आहे.  

बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या आठवडे बाजारात सदरची घटना घडली आहे. या घटनेत वाशीम जिल्ह्यातील नितीन नामदेव गायकवाड ऊर्फ गोलू (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. नितीन गायकवाड हा सध्या शेगाव मधील नागझरी रोडवरील तीन पुतळा परिसरात वास्तव्यास होता. त्याच्याविरोधात विविध ठिकाणी तीन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. 

Shegaon Crime
Gold Rate : प्रति तोळा ७ हजारांनी सोनं झालं स्वस्त, चार दिवसात मार्केटमध्ये घसरण, वाचा नवे दर काय?

जुन्या वादातून हत्या झाल्याचा अंदाज 

जुन्या वादामुळेच ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. पोलिसांनी साक्षीदारांची माहिती घेण्यास सुरुवात केली असून घटनेनंतर आठवडे बाजारात गर्दी झाली होती. आरोपी आणि मृतक हे सोबतच राहत होते. आपसात वाद झाला आणि त्यानंतर आरोपींनी कसाबच्या दुकानातील सुरा घेऊन नितीनच्या गळ्यावर सपासप वार केले. रात्री उशिरा पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

Shegaon Crime
Bhandara Rain : भंडाऱ्यात पावसाने झोडपले; धानाला कोंब फुटण्याची भीती

विद्युत पोलावरील अल्युमिनियम तार चोरणारी टोळी जेरबंद

लातूर : मागील काही महिन्यापासून लातूर जिल्ह्यातील अनेक भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत होती. यात लाईट खांबावरील अल्युमिनियमच्या विद्युत तारा चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. याच अनुषंगाने विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली असून तारा चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केलं आहे. त्यांच्याकडून एकूण दहा लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com