ड्रग्ज विकणाऱ्याला हटकलं, काँग्रेस नेत्यावर कोयत्याने सपासप वार, उल्हासनगर हादरले

Drug Peddler Tries to Kill Ex-Congress Corporator: काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न. आरोपीला अंमली पदार्थ विकताना हटकलं. पोलिसांनी आरोपीला पकडलं.
Drug Peddler Tries to Kill Ex-Congress Corporator
Drug Peddler Tries to Kill Ex-Congress CorporatorSaam Tv
Published On
Summary
  • उल्हासनगरात भयंकर घडलं.

  • काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर हल्ला.

  • आरोपी अटकेत.

उल्हासनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. अंमली पदार्थ विक्रेत्याला हटकल्यामुळे शाब्दिक वाद झाला. यामुळे माजी नगरसेवकावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

तुलसी वसीटा (वय वर्ष ७०) असे काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. वसीटा उल्हासनगर कॅम्प 4 मधील श्रीराम चौकाजवळील वसीटा कॉलनीतील रहिवासी आहेत. तर, अजय बागुल असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय बागुल हा अंमली पदार्थ विक्रेता आहे. आरोपी बागुल या परिसरात नशेचे पदार्थ विकण्यासाठी येत असतो.

Drug Peddler Tries to Kill Ex-Congress Corporator
२ लाख शेतकऱ्यांच्या तोंडचा घास गेला, १५६ जनावरं दगावली; अतिवृष्टीमुळे ८ जणांचा मृत्यू, सोलापूरात पावसांचं रौद्ररूप

मंगळवारीही तो अंमली पदार्थ विकण्यासाठी आला होता. वसीटा यांनी आरोपी बागुलला हटकले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. बागुलनं कंबरेला असलेला धारदार कोयता काढला. तसेच आरोपीनं वसीटा यांनी आरोपीवर वार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात वसीटा थोडक्यात बचावले.

Drug Peddler Tries to Kill Ex-Congress Corporator
डॉक्टरचं नर्ससोबत अनैतिक संबंध, भुलीचं इंजेक्शन दिलं, विवस्त्र करून रस्त्यावर फेकलं अन् कारनं चिरडलं

या प्रकरणनंतर वसीटा यांनी तातडीनं विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच अजय बागुल विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिांसानी आरोपी बागुल विरोधात जीवेठार मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ आणि धमकावणे या गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com