मुंबई: मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात नमाज पठणासाठी लेखी परवानगी मागण्यात आली आहे. औरंगाबादचे वकिल नईम शहाबुद्दीन शेख यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहीत नमाज पठण (namaj prayers) करु द्यावे अशी मागणी केली आहे. वकिल नईम शहाबुद्दीन शेख म्हणाले की, हे खेळाचं मैदान आहे, हे ४५ दिवस राखीव असंत. यावेळी यात अनेक सण साजरे होतात. तर आता आम्हालाही एक दिवस परवानगी द्यावी अशी मागणी वकिल नईम शहाबुद्दीन शेख यांनी केली आहे. (Allow namaj prayers in Shivaji Park; Written demand of Aurangabad lawyer)
हे देखील पाहा -
शिवाजी पार्कपासून (Shivaji Park) काही अंतरावरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान आहे. राज ठाकरेंनी मशिदींसमोर भोंगे वाजवण्याची भूमिका घेतली होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून वकिल नईम शहाबुद्दीन शेख यांची ही भूमिका असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे ही परवानगी ३ मे रमजान ईदच्या दिवशी मागण्यात आली आहे. या दिवशी राज ठाकरेंनी सरकारला दिलेला भोंग्याबाबत निर्णय घेण्यासाठीच्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे.
राज ठाकरेंनी मशिदीसमोर भोंगे वाजवण्याची घोषणा केली होती. त्याला शह देण्यासाठी ही परवानगी मागितली का? असा सवाल विचारला जातोय. शिवाजी पार्क मैदान हे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनुसार महाराष्ट्र दिन, महापरिनिर्वाण दिन, दसरा मेळावा, गुडी पाडवा आणि मराठी भाषा दिन यापैकी 5 समारंभांना राखीव ठेवलं जातं. या पाच दिवसांत आता रमजान ईदचाही समावेश करावा, अशी मागणी यात करण्यात आलीय. या अर्जाची प्रत शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडेही पाठवलीय.
मशिदींवरील भोंग्याबाबत राज ठाकरे आक्रमक :
२ एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे म्हणाले होते की, मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील, मी धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले होते.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.