Alliance Deadlock: Raj Thackeray awaits Uddhav Thackeray’s official call as MNS dismisses informal talks. Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Shiv Sena-MNS Alliance : राज-उद्धव ठाकरेंची युती नेमकी अडली कुठं? मनसेच्या नेत्यांनी कारणच सांगून टाकलं

Thackeray brothers alliance : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबाबत अद्याप कोणताही औपचारिक प्रस्ताव शिवसेनेकडून आलेला नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray, Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. प्रस्ताव कुणी पाठवायचा, यावरून ठाकरे बंधूंच्या युतीचं घोडं अडल्याचं समोर आले आहे. संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांना दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झालीही असेल, असे वक्तव्य करून खळबळ उडवली होती. यावर मनसे नेत्यांनी पत्रकार परिषद घेत असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे स्पष्ट केले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत कोणताही औपचारिक प्रस्ताव अद्याप मनसेकडे आलेला नाही, असे संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले. फक्त कॅमेऱ्यासमोर बोलून युती होत नसते, असा टोला शिवसेनेला लगावत त्यांनी ‘प्रस्ताव येईल तेव्हा राज ठाकरे निर्णय घेतील’, असेही सांगितले. याआधी झालेल्या चर्चांमुळे आता मनसेकडून सावध भूमिका घेतली जात आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले असले तरी राजकीय स्पष्टता अद्याप नाही.

मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेत मनसेची भूमिका स्पष्ट केली. फक्त कॅमेऱ्यासमोर बोलून युती होत नाही. शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जोपर्यंत प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत निर्णय कसा घ्यायचा? असा सवाल संदीप देशपांडे यांनी कॅमेऱ्यासमोर उपस्थित केला.

युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अथवा पक्षांतर्गत याबाबत कोणतीही अद्याप चर्चा झालेली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रस्ताव आलाच नाही, तर चर्चा काय करणार, असेही देशपांडे म्हणाले. ठाकरेंच्या शिवसेनेबाबात काय वाटतं, याबाबत दररोज संजय राऊत बोलतात. पण आतापर्यंत शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, जेव्हा प्रस्ताव येईल, तेव्हा राज ठाकरे निर्णय घेतील, असे देशपांडे यांनी सांगितले.

आता ताकही फुंकून पिणार, देशपांडेंची सावध भूमिका -

याआधीही दोन ते तीन वेळा शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये युतीची पडद्यामागे चर्चा झाली. त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी पडद्यामागून प्रस्ताव पाठवला होता, पण काय झालं हे तुम्ही पाहिलं. आता आम्ही ताकही फुंकून पिणार आहे. कॅमेऱ्यासमोर बोलण्यापेक्षा संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांना एक फोन करण्यासाठी सांगायला हवं, राज ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे देशपांडे म्हणाले.

राज ठाकरे १० पावले पुढे येतील, अविनाश जाधवांना विश्वास

दोन्ही भावांकडे एकमेंकाचे नंबर आहेत. उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हिकासाठी राज ठाकरे यांना फोन करावा. राज ठाकरे नक्कीच या प्रस्तावावर विचार करतील. तुम्ही एक पाऊल पुढे या, राज ठाकरे दहा पावले पुढे येतील. युतीचा प्रस्ताव येईल तेव्हा राज ठाकरे निर्णय नक्कीच घेतील, असे अविनाश जाधव म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

SCROLL FOR NEXT