Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, कोणत्या जिल्ह्याला अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update : राज्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, गोंदिया, नांदेड व इतर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Weather: वाचा हवामानाचा अंदाज
Maharashtra braces for stormy weather: IMD forecasts rain, thunder, and gusty winds across multiple districts in the coming days.Saam TV News
Published On

Maharashtra Rain News Update : सध्या महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे नद्या-नाले खळाळून वाहत आहेत. तसेच धरणांमधील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. आता पुन्हा राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील 24 तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोकण : कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणारा सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, 40 ते 50 किमी प्रतितास वेगाचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather: वाचा हवामानाचा अंदाज
Pune : सॉरी! माझी जगायची इच्छा संपली, हिंजवडीत २१ व्या मजल्यावरून IT इंजिनिअर तरूणीने घेतली उडी

विदर्भात पाऊस कधी कोसळणार ? वाचा हवामान विभागाचा अंदाज -

मॅान्सून विदर्भात सक्रीय होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे. विदर्भात १३ ते १४ जूनच्या सूनरास मॅान्सून सक्रीय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २८ मे रोजी गडचिरोलीत पोहोचलेला मॅान्सून आठ दिवसांपासून तिथेच खोळंबला आहे. १३ ते १४ जूनला पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात मॅान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.

१७ ते २० जूनपर्यंत मॅान्सून पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सक्रिय होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यात तापमानाचा चढ-उतार सुरू राहील, तापमान 39 ते 40 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उकाड्याचा त्रास आणखी काही दिवस असाच सहन करावा लागणार आहे.

Maharashtra Weather: वाचा हवामानाचा अंदाज
Shocking : भारतीय क्रिकेटपटूचा ट्रेनमध्ये मृत्यू, ३ तास तडफडत राहिला पण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com