Akshay Shinde Saam Digital
मुंबई/पुणे

Akshay Shinde Encounter : बदलापूरचा अर्धवट बदला? चाईल्ड पोर्नोग्राफीचं रॅकेट चालवणारा संस्थाचालक मोकाट?

Badlapur Case : बदलापूर प्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. मात्र आता या प्रकरणातील संबंधित शाळा प्रशासनावर मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप करण्यात आला आहे.

Snehil Shivaji

काल पोलिसांनी कथित एन्काऊंटरमध्ये बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंला यमसदनी धाडलं. पोलिसांच्या या कारवाईचं काहींनी समर्थन करत फटाके फोडले, मात्र एन्काऊटरनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. चिमुऱडीवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे हा मुख्य आरोपी असून सह आरोपींचे काय? सह आरोपी संस्थाचालक, सचिव अजून फरार कसे? संस्थाचालकांना अटक न केल्यानं हायकोर्टानं पोलिसांना फटकारूनही कारवाई का नाही? फरार आरोपींना राजकीय आश्रय आहे का? शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे पोलिसांसमोरच कसे फरार झाले?

बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणाला आता 50 दिवस झाले तरी संस्थाचालकांवर कारवाई न झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. यासंस्थाचालकांवर पोक्सोतर्गंत गुन्हा दाखल असून इतकी किळसवाणी घडना घडल्यानंतर संस्थाचालकांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे संस्थाचालकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला मारलं असा आरोप विरोधकांनी केलाय.

बदलापूरच्या आरोपीला पोलिसांनी एन्काऊंटर मध्ये संपवलं पण संस्थाचालक अद्याप फरार आहेत आणि आता सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी शाळा प्रशासनावर मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप केला तसंच यासंदर्भात बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं संपूर्ण तपास तातडीनं सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी त्यांनी जनहीत याचिकेद्वारे केलीये.

जनहित याचिकेत त्यांनी काय म्हटलंय?

शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी

घटनेच्या दुसऱ्या दिवशी आणखीन एक मुलगी बेपत्ता

शाळेतील सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारीही गायब

आरोपी अक्षय शिंदेला मीरा बोरवणकरांशी बोलण्याची इच्छा

हायकोर्टानं स्थापन केलेल्या विशेष समितीपुढे अक्षय गेला तर मोठ्या लोकांची नावं समोर येतील म्हणून अक्षयचं एन्काऊंटर

त्यामुळे आता बदलापूर अत्याचार प्रकरणाला दडपण्याचं पाप करणाऱ्या क्रूर, नराधम आणि समाजविघातक संस्थाचालकांना तरी या अत्याचार प्रकरणात कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. जेणे करुन अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याची हिंम्मत कोणाची होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT