ajit pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : चौफुल्याला जाऊन तडफडू नका, बदनामी होते, अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना दम; पाहा VIDEO

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त विधान आणि कृती करणाऱ्या कार्यकर्त्यांचे चांगेलच कान टोचले आहे. चौफुल्याला जाऊन तडफडू नका, बदनामी होते, असं म्हणत अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दम दिला.

Priya More

Summary -

  • अजित पवार यांचा पुण्यात कार्यकर्त्यांना शिस्तीचा इशारा.

  • चौफुला गोळीबार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची कान उघडणी.

  • ‘तडफडू नका, बदनामी होते’ असा दम अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

  • 'आपण एक कुटुंब, एकमेकांचा द्वेष करू नका' , असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

सचिन जाधव, पुणे

मंत्री, नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बेताल आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकार अडचणीत आले आहे. यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. पुण्यामध्ये भाषण करताना त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सल्ला देत त्यांचे कानही टोचले आहेत. 'राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहात, चूक होऊ देऊ नका. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका.', असे म्हणत त्यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलाच दम दिला.

पुण्यात पीडीसीसी बँकेत एका कार्यक्रमासाठी अजित पवार आले होते. अजित पवार यांनी यावेळी कार्यर्त्यांची कान उघडणी करताना सांगितले की, 'तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात. तुमच्याकडं कधी, कुठे, काही चूक होऊ देऊ नका. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका. कुठे जाऊन ठौय ठौय दटशश करू नका.' आमदार शंकर मांडेकर यांच्यासमोरच अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी दिली. दौंडच्या चौफुला येथे झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. शंकर मांडेकर यांच्या भावावरती चौफुला येथे गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

अजित पवारांनी पुढे सांगितले की, 'मी आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना मी नीट वागलं आणि बोललं पाहिजे. माझा प्रत्येक शब्द न शब्द शूटिंग चालूये. त्यामुळे पूर्वी म्हणता यायचं 'मी असं बोललो नाही, कारण काही पुरावा नसायचा. तो काळ गेला ३५ वर्षांपूर्वीचा. आता लगेच दाखवतात बघा काय बोलला? आणि ते एकदा नाही तेच तेच तेच... लोकं म्हणतात लका कितीदा बोललं हे, आणि काय सांगतो बोलला नाही. असं टेक्निक चालू आहे. त्यामुळे तारतम्य ठेवून बोला.

तसंच, 'मघाशी चंद्रकांत पण कोणावर तरी खेकसला. अरे चंद्रकांत तू माझ्यावर जाऊ नकोस. मला लोकांनी मान्य केलं आहे. लोकं म्हणतात हा बोलला म्हणजे काम होणार. नक्की आता आपलं काम होणार. अशी माझ्या बद्दल लोकांना विश्वास होणार आहे. तरी देखील मी आता जबाबदारी वाढल्यापासून चांगलं बोलायचा प्रयत्न करतो. आता बघा सगळ्यांना फोटो काढू दिले. शेवटी मला तुमची आणि तुम्हाला माझी गरज आहे. आपण एक परिवार झालोय. एकमेकांचा दुस्वास करायला एकत्र आलेलो नाही.' असं म्हणत अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची कान उघडणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीच्या आणखी एका मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य, कानाखाली मारीन...भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला धमकावले|VIDEO

Beed Mahadev Munde : महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग, एसआयटी गठीत

Mahadev Munde Case: 'मी आत्महत्या करेन, याला जबाबदार जितेंद्र आव्हाड'; गोट्या गीतेच्या नव्या VIDEO ने खळबळ; पाहा काय म्हणाला?

Nokia 1100: नोकिया ११०० नवा कीपॅड फोन लाँच! स्वस्त किंमतीत युजर्ससाठी खास, जाणून घ्या किंमत आणि दमदार फिचर्स

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT