Pune : परीक्षेसाठी सुट्टी काढून घरी आला, पण काळाने घात केला; पुण्यात २७ वर्षीय जवानाचा मृत्यू

Pune News : भारतीय सैन्यदलातील एक जवान ५ दिवसांची सुट्टी काढून गावी आला होता. या जवानाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. जवानाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Pune News
Pune News xx
Published On
Summary

पुण्यात २७ वर्षीय जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

हा जवान ५ दिवसांची सुट्टी काढून गावी आला होता.

पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील राजपूर येथे ही दुःखद घटना घडली आहे.

पुण्यात भारतीय सैन्य दलातील एका २७ वर्षीय जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा जवान सैन्यदलातून पाच दिवसांच्या सुट्टीसाठी गावी आला होता. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील राजपूर येथे ही दुःखद घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्युमुखी पडलेल्या जवानाचे नाव सुभाष अनिल दाते (वय २७ वर्षे) असे आहे. सुभाष दाते हे जम्मू-काश्मीर येथे बीआरओ म्हणजेच बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशनमध्ये डीईएस (ड्राइंग एस्टेब्लिशमेंट सुपरवाइझर) पदावर कार्यरत होते. सैन्यात कार्यरत असताना पुढील परीक्षेचे पेपर द्यायचे असल्यामुळे सुभाष पाच दिवसांची सुट्टी घेऊन मामाच्या गावी राजपूर येथे गेले होते.

Pune News
Pune : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दारूड्या तरुणाला अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, काल (३० जुलै) झोपेतून उठताना सुभाष यांच्या छातीत दुखायला सुरुवात झाली. शेजाराच्या मदतीने त्यांच्या कुटुंबियांनी सुभाष यांना तळेघरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्यांना घोडेगाव येथे पाठवण्यात आले. घोडेगाव येथे डॉक्टरांनी त्यांची पाहणी केली. त्यांनी उपचारापूर्वीच सुभाष दाते यांचा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले. मंचर येथे शवविच्छेदन झाल्यानंतर राजपूर येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला आदिवासी विभागातील मोठा जनसमुदाय हजर होता.

Pune News
Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा हादरा, बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

जवान सुभाष दाते हे लहानपणापासून त्यांच्या मामाच्या गावी राहत होते. मामा चंदू लोहकरे आणि आई सुमन दाते यांनी त्यांचा सांभाळ केला. शिनोली येथे त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर आयटीआयचा कोर्स पूर्ण करुन ते भारतीय सैन्य दलात सामील झाले. दोन वर्षांपासून ते भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत होते. पुढच्या परीक्षेचे पेपर द्यायचे असल्याने ते गावी आले होते.

Pune News
Dharashiv : हात मोडले, डोके फोडले! दगड-काठ्या घेऊन जमावाची मारहाण, धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीत राडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com