Dharashiv : हात मोडले, डोके फोडले! दगड-काठ्या घेऊन जमावाची मारहाण, धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीत राडा

Dharashiv News : गावाच्या बाजूला डांबरी रस्ता वापरण्यावरुन पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. जमावाने केलेल्या मारहाणीमध्ये कंपनीच्या पाच कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत.
Dharashiv News
Dharashiv Newsx
Published On
Summary
  • धाराशिवमध्ये पुन्हा एकदा पवनचक्की कंपनीत राडा, जमावाकडून कर्मचाऱ्यांना मारहाण

  • पवनचक्कीच्या कामासाठी गावच्या बाजूचा डांबरी रस्ता वाहतुकीस वापरायचा असेल तर पैसे द्या म्हणत बेदम मारहाण

  • पवनचक्कीच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, पाच कर्मचारी गंभीर जखमी

बालाजी सुरवसे, साम टीव्ही, प्रतिनिधी

धाराशिवमध्ये पुन्हा एकदा पवनचक्की कंपनीमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. पवनचक्कीच्या कामासाठी गावाच्या बाजूचा डांबरी रस्ता वाहतुकीसाठी वापरायचा असेल, तर पैसे द्यावे लागतील असे म्हणत पवनचक्कीच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये घुसून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील धानोरी नंदी पाटील रस्त्यावर काल मध्यरात्री ही घटना घडली आहे. पवनचक्कीच्या कामासाठी कंपनीतील कर्मचारी हे गावच्या रस्त्याने ये-जा करत असत. यावरुन या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. जमावाने दगड, काठ्यांनी मारहाण केल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Dharashiv News
Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा हादरा, बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

पवनचक्कीच्या कामासाठी गावच्या बाजूचा डांबरी रस्ता वापरायचा नाही असा दम देत मारहाण झालेल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. वाहन अडवून प्रत्येक वाहनाकडून पैसे घेत जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. कर्मचाऱ्याचे हात मोडले, डोके, फोडले, डोळ्याला गंभीर इजा झाल्याचे म्हटले जात आहे.

Dharashiv News
Pune : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दारूड्या तरुणाला अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

मारहाणीमध्ये जखमी झालेल्या पाच कर्मचाऱ्यांवर उमरगा येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. यातील एकाची प्रकृती खालावल्याने त्याला सोलापूरला हलवण्यात आले. या मारहाण प्रकरणामध्ये लोहारा पोलीस स्टेशनमध्ये कलम १०९, ३०८, १२६, ११८, ११५, ३५२, १८९, १९१, १९०, ३२४ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्यांपैकी पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

Dharashiv News
Shocking : ३६० डिग्री फिरणारा पाळणा कोसळला, खांबाचे दोन तुकडे झाले अन् डोळ्यासमोर सारं संपलं; Viral Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com