Ajit Pawar, Sharad Pawar saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar Vs Sharad Pawar : अजित पवारांची 18 वर्षांची खदखद अखेर बाहेर पडली; 2004 पासून नेमकं काय-काय घडलं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ajit Pawar News : राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. शिवसेनेच्या फुटीला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या 35 आमदारांसह शिंदे-फडवणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु होतीच, त्यातूनच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र अजित पवारांची नाराजी ही काही महिने नाही तर तब्बल 18 वर्षांपासूनची आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी प्रदेशाध्यक्षपदाची उघड मागणी केली होती. तर शरद पवारांची देखील पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मोठी खेळी खेळी होती. तेव्हापासून राष्ट्रवादीत अंतर्गत धुसपूस सुरु आहे, अशी चर्चा होती. (Political News)

2004 साली मुख्यमंत्री पद न घेण्यावरुन मतभेद

2004 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद येणे अपेक्षित होतं. मात्र पक्षाने मुख्यमंत्रिपदाची उत्तम संधी गमावली होती. 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही सर्वात मोठी चूक होती, असं अजित पवार यांना बोलूनही दाखवलं होतं. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ७१ तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. यानंतरचं शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील गटबाजी सुरू झाली. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीतही तिकीट वाटपावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

भुजबळांना उपमुख्यमंत्री पद

2008 मध्ये छगन भुजबळ यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने अजित पवारही नाराज झाले होते. 2010 मध्ये आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. तसेच 2012 साली अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्यावेळी अजित पवार यांनी अचानक राजीनामा दिला होता.

पार्थ पवारांच्या उमेदवारीला विरोध

2019च्या लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने योग्य साथ न दिल्याने अजित पवार नाराज होते. त्यामुळेच पार्थ पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला असं बोललं जातं. या निवडणुकीत पार्थ पवार यांच्या उमेदवारीला शरद पवारांनी विरोध केल्याचेही बोलले जात आहे. मात्र त्यानंतरही पार्थ पवार यांनी मावळमधून निवडणूक लढवली, त्यात त्यांचा पराभव झाला. यावेळीही अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील मतभेद स्पष्टपणे दिसून आले.

2019 मध्ये पहाटेचा शपथविधी

महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधीही भाजपसोबत जाण्याची अजित पवारांची इच्छा होती. त्यावेळीही अजित पवार यचांनी अचानक भाजपला पाठिंबा दिला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण तेव्हा शरद पवारांनी ही बंडखोरी थांबवली होती. त्यांनी 48 तासांत सर्व आमदारांना एकत्र केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT