sachin kharat news  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; दादांचा निकटवर्तीय नेता शरद पवार गटाच्या वाटेवर? वाचा

sachin kharat news : अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजितदादांचा निकटवर्तीय नेता शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे अनेक नेत्यांना उमेदवारीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नेते राजकीय पक्षांच्या अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांना भेटत आहेत. अशातच अजित पवार यांचे निकटवर्तीय सचिन खरात यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. सचिन खरात यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सचिन खरात शरद पवार गटाच्या वाटेवर?

अजित पवार यांना शरद पवार यांनी आणखी एक धक्का दिल्याची चर्चा आहे. रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडियाच्या खरात गटाचे प्रमुख सचिन खरात हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. सध्या सचिन खरात यांचा पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे.

शरद पवार आणि सचिन खरात यांच्या भेटीने चर्चांंना उधाण

सचिन खरात यांनी पुण्यातील निसर्ग कार्यालयात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. सचिन खरात आणि शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यानंतर सचिन खरात यांनी ही भेट राजकीय नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय.

इंदू मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विषयासाठी भेट घेतल्याचं खरात यांचं म्हणणं आहे. मात्र, खरात यांच्या भेटीनंतर ते शरद पवार यांच्याबरोबर जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

महाराष्ट्रातील बीआरएस पक्ष शरद पवार गटात विलीन होणार

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची मोठी खेळी महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बीआरएस पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात विलीन होणार आहे. येत्या सहा तारखेला हजारोच्या संख्येने पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात पवार साहेबांच्या उपस्थितीत बीआरएसचे कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकारणी आणि पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. बीआरएसचे महाराष्ट्र मुख्य समन्वयक बाळासाहेब देशमुख यांनी माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT