Ajit Pawar on Raj Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Shirdi : भाषणानं प्रश्न सुटणार का? राज ठाकरेंनी आत्मचिंतन करावं : अजित पवार

आज उपमुख्यमंत्री अजित पवार नगर जिल्हा दाै-यावर आले आहेत.

गोविंद साळुंके

नगर : इथं हा भाेंगा लावा, तिथं ताे भाेंगा लावा असे म्हणणे साेपे आहे. परंतु आपण काय बाेलत आहाेत याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. भडकाऊ भाषणं करुन काय साध्य करायचे आहे असा प्रश्न उपमख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या गुढी पाडव्याच्या भाषणावरुन केला आहे. (ajit pawar latest marathi news)

नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील पोलिस दलाच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री पवार आले आहेत. त्यावेळी केलेल्या भाषणातून पवार यांनी राज ठाकरेंच्या मशिदी समाेर हनुमान चालिसा लावा या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले त्यांचेच नगरसेवक म्हणत आहेत. आम्हांला निवडणुका लढवयाच्या आहेत अन् हे काय बाेलत आहेत. कूठं तरी काेणाला तरी बरं वाटण्यासाठी आणि निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून अशी भडकाऊ भाषणं करायची हे शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला परवडणारे नाही असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर नमूद केले. (Ajit Pawar on Raj Thackeray)

दरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रारंभी कार्यक्रमाला उशीर झालं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पोलिस दल कुठला ही प्रसंग आला तिथे धाऊन जातो. त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा देणं हे आमचं काम आहे असेही नमूद केले. दरम्यान मंत्री पवार यांच्या हस्ते शिर्डी येथील उप विभागीय पोलिस कार्यालयाचे उद्घाटन झाले. तसेच नव्याने पोलिस दलात दाखल झालेल्या नवीन पोलिस वाहनांची पूजा तसेच शिर्डी येथील ११२ निवासस्थानांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात २ पाेलिसांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ आदी उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT