Refinery ला समर्थन की विराेध; धाेपेश्वरात आज ग्रामसभेत हाेणार फैसला

एकूण २७०० ग्रामस्थांच्या हाती अंतिम निर्णय.
refinery project
refinery projectsaam tv
Published On

रत्नागिरी : कोकणातील (kokan) धोपेश्वर (dhopeshwar) येथे रिफायनरी प्रकल्पाबाबत (refinery project) आज ग्रामसभा (gramsabha in dhopeshwar) आयाेजित करण्यात आली आहे. या ग्रामसभेत एकूण २ हजार ७०० ग्रामस्थ सहभागी हाेतील असा अंदाज ग्रामसेवक निरंजन देसाई यांनी व्यक्त केला आहे. आजच्या ग्रामसभेत रिफायनरीला विराेध हाेताे की समर्थन मिळणार हे स्पष्ट हाेणार आहे. (dhopeshwar refinery project live marathi news)

दरम्यान या ग्रामसभेची नियमवाली जाहीर करण्यात आली आहे. बारसू, सोलगाव, धोपेश्वर, तिठवली, पन्हळे तर्फे राजापूर, बागकाझी हुसेन, बागअब्दुल कादिर ही सहा महसूली गावं निर्णय प्रक्रियेत होणार सहभागी हाेतील.

refinery project
Helmet: महाराष्ट्रात हेल्मेट वापराबाबतचा 'ताे' निर्णय व्हावा : उदय सामंत

रिफायनरीबाबत तीन प्रकारची मते आजमावली जाणार आहेत. व्यासपीठावरून कुणालाही मत प्रदर्शन करण्याचा अधिकार दिला जाणार नाही. विरोधक, समर्थक आणि तटस्थ अशा तीन प्रकारची निर्णय प्रकिया हाेईल. रजिस्टरवर निर्णय प्रक्रियेची नोंद केली जाणार आहे. दरम्यान या सभेसाठी एकूण २ हजार ७०० ग्रामस्थ सहभागी हाेतील असा अंदाज ग्रामसेवक निरंजन देसाई यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

refinery project
Satara: इथं ओशाळली माणुसकी! ट्रक अपघातात चालक ठार; लाेकांनी पळवली कलिंगडं
refinery project
Akola: सरकारवर बच्चू कडू नाराज; खदखद केव्हाही बाहेर पडेल दिला इशारा
refinery project
Chiplun : या प्रश्नाचं उत्तर केंद्र सरकारलाच विचारा : आदित्य ठाकरे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com