Akola: सरकारवर बच्चू कडू नाराज; खदखद केव्हाही बाहेर पडेल दिला इशारा

अभिनेते नाना पाटेकरचा फॅन असल्याने त्यांचा चित्रपट पाहून मी प्रहार पक्ष स्थापन केल्याचे बच्चू कडू यांनी एका प्रश्नास उत्तर देताना सांगितलं.
Bachchu Kadu
Bachchu KaduSaam Tv
Published On

अकोला : शेतकऱ्यांच्या (farmers) प्रश्नांना घेऊन मी समाधानी नाही. केंद्र सरकार असू दे की राज्य सरकार (maharashtra government) मी मंत्री जरी असलो तरी शेतकऱ्यांसाठी फार समाधानी नाही. त्याच दुःख असल्याचे परखड मत राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांनी येथे (akola) व्यक्त केले. (bacchu kadu latest marathi news)

अकोल्यात एका कार्यक्रमात बच्चू कडू यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी विविध प्रश्नांवर बच्चू कडू यांनी रोखठोक उत्तर देत उपस्थितांसमाेर आपले आक्रमक व्यक्तिमत्व दाखवून दिलं.

नोकरी भरतीत होत असलेल्या घोटाळ्याबाबत बच्चू कडू म्हणाले भरती प्रक्रिया ही पारदर्शक व्हायला पाहिजे. यासाठी मी मंत्रिपद सोडेन असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान शिवसेना (shivsena) का सोडली यावरही त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले एका शौचालयाच्या भ्रष्टाचार वरून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे मी सेनेला जय महाराष्ट्र (maharashtra) केला असेही त्यांनी नमूद केले.

Bachchu Kadu
Bank Of Maharashtra चं एटीएम मशीन पळविलं; चाेरट्यांचा तपास सुुरु

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अजिबात समाधानी नसल्याची खंत बच्चू कडू यांनी व्यक्त करीत माझी खदखद केव्हा ही बाहेर पडेल असा इशाराच त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला एका प्रश्नाचे उत्तर देताना दिला. बच्चू कडू म्हणाले शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे, कर्जमाफी किती झाली हे महत्त्वाचे नाही. पाच वर्षात आपण 50 हजाराने शेतकऱ्यांना लुटतो आणि 20 हजाराची त्याला कर्जमाफी देतो. खरंतर एकीकडे तूर सोयाबीन आयात करून त्याचे भाव पाडण्यात आले. कोणतेही सरकार शेतकऱ्यांना हमीभाव देऊ शकत नाही अशी औकात कुठल्याही पक्षाची अथवा कोणत्याही सरकारची नाही असेही त्यांनी नमूद केले.

प्रहार पक्षाची स्थापना

दरम्यान अभिनेते नाना पाटेकरचा (nana patekar) फॅन असल्याने त्यांचा चित्रपट पाहून मी प्रहार पक्ष स्थापन केल्याचे बच्चू कडू यांनी एका प्रश्नास उत्तर देताना सांगितलं.

Edited By : Siddharth Latkar

Bachchu Kadu
Maharashtra Kesari: साता-यात आजपासून रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
Bachchu Kadu
Raigad: रायगडावरील 'ताे' प्रकार पाेलिस दडपू इच्छितात : पुजा झाेळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com