Ajit Pawar Emotional Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar Emotional: कंठ दाटला, शरद पवारांबाबत बोलताना भर मंचावर अजितदादा भावुक; VIDEO

Satish Kengar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिनी आहे. याच कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार भावुक झाले आहेत. शरद पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना अजित पवार यांचा कंठ दाटून आल्याचं पाहायला मिळालं.

''राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून 24 वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या शरद पवार यांनी दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षच्या वतीने मी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो'', असं म्हणताना अजित पावर भावुक झाले आणि त्यांचा कंठ दाटून आला.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यांना फक्त एकच जागा जिकंण्यात यश मिळालं आहे. यामुळे आता अजित पवार गटाचे काही आमदार पुन्हा शरद पवार गटात परंतु शकतात, अशा चर्चा होत आहे. यावरच बोलताना अजित पवार म्हणाले की, ''काही बातम्या पेरल्या जातात, हे इकडं तिकडं जाणार आहे, असं सांगतात. हे संभ्रम निर्माण करण्यासाठी होतंय.''

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले आहेत की, दिल्लीतर काही लोकांवर कारवाई केली तरी सातपैकी सात जागा भाजपच्या आल्या. नितीश कुमार, चंद्रा बाबू यांच्याबरोबर मागास समाज राहिला, हे खरे आहे.तसंच आपल्याला राहावं लागेल. त्यामुळं जो समाज आपल्यापासून दूर गेलाय तो जवळ आणावा लागेल.

ते म्हणाले, ''राज्याच्या निवडणुकीत संविधान बदलायचा विषय येत नाही. साडे नऊला एक भोंगा (संजय राऊत यांना टोला) वाजतो, तसं दुसऱ्या पक्षातही भोंगा वाजतोय. काँग्रेसमध्ये एक आहे, आपल्या दुसऱ्या गटातला एक आहे. त्याची नौटंकी सुरु (रोहित पवार यांना टोला) आहे. तो सांगतो मला आमदारांचे ‌फोन येतात‌.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

SCROLL FOR NEXT