7 खासदार तरीही एकच राज्यमंत्रिपद; एक खासदार असणाऱ्यांनाही मिळालं कॅबिनेट मंत्रिपद; शिंदेंवर अन्याय?
Shinde Group Got One Minister Post in Modi CabinetSaam Tv

Politics News: 7 खासदार तरीही एकच राज्यमंत्रिपद; एक खासदार असणाऱ्यांनाही मिळालं कॅबिनेट मंत्रिपद; शिंदेंवर अन्याय?

Eknath Shinde Group: नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच 72 नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र यामध्ये सात खासदार असूनही शिंदे गटाला फक्त एकच मंत्रिपद देण्यात आलंय.
Published on

रविवारी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच 72 नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यातच सात खासदार असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला केवळ एकच मंत्रिपद देण्यात आलंय. प्रतापराव जाधवांना राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आलाय.

मात्र कुमारस्वामी, चिराग पासवान आणि जीतनराम मांझींच्या पक्षाचे तुलनेत कमी खासदार आहेत. त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागलीये. शिंदेंना एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ऐनवेळी त्यांना केवळ एक राज्यमंत्रिपद देऊन बोळवण करण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरुये.

7 खासदार तरीही एकच राज्यमंत्रिपद; एक खासदार असणाऱ्यांनाही मिळालं कॅबिनेट मंत्रिपद; शिंदेंवर अन्याय?
Priyanka Gandhi: लोकसभेत काँग्रेस पक्षाचं संख्याबळ वाढणार? अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी घेतली प्रियंका गांधी यांची भेट

कोणत्या पक्षाला कोणतं मंत्रिपद मिळालं?

एनडीएत शिंदे गट चौथ्या स्थानी आहे. यातच 7 खासदार असूनही त्यांना फक्त एकच राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. यामध्ये 5 खासदार असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाला कॅबिनेटमंत्रिपद देण्यात आलं आहे. तसेच 3 खासदार असलेल्या जेडीएसला देखील कॅबिनेटमंत्रिपद मिळालं आहे. तर 1 खासदार असलेल्या हिंदुस्थानी अवामी मोर्चाला कॅबिनेटमंत्रिपद मिळालं आहे.

'शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्री पद देऊन, दुजाभाव करण्यात आला'

दरम्यान, एनडीए सरकार स्थापन होऊन 24 तासही उलटले नाहीत, तोच एनडीएतली खदखद चव्हाट्यावर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्री पद देऊन, दुजाभाव करण्यात आला. आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होतं, असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय.

7 खासदार तरीही एकच राज्यमंत्रिपद; एक खासदार असणाऱ्यांनाही मिळालं कॅबिनेट मंत्रिपद; शिंदेंवर अन्याय?
CM Shinde Coastal Road Inspection: रस्त्यांच्या विस्ताराप्रमाणे मंत्रीमंडळाचा विस्तारही लवकरच होईल: मुख्यमंत्री शिंदे

ज्या पक्षांचे एक-एक खासदार निवडून आले यांना कॅबिनेटमंत्रीपद दिलं गेलं. मग शिंदे गटाबाबत हा दुजाभाव कशासाठी? असा सवालही बारणेंनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com