CM Shinde Coastal Road Inspection: रस्त्यांच्या विस्ताराप्रमाणे मंत्रीमंडळाचा विस्तारही लवकरच होईल: मुख्यमंत्री शिंदे

CM Shinde On State Cabinet Expansion : आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज कोस्टल रोडची पाहणी केली. हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याने मरीन ड्राइव्हपासून हाजीअलीपर्यंतचे अंतर गाठणं फक्त काही मिनिटांमध्ये शक्य होणार आहे.
CM Shinde Coastal Road Inspection: रस्त्यांच्या विस्ताराप्रमाणे मंत्रीमंडळाचा विस्तारही लवकरच होईल: मुख्यमंत्री शिंदे
CM Shinde On State Cabinet Expansion संग्रहित छायाचित्र

वैदेही काणेकर, साम प्रतिनिधी

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोस्टल रोडची पाहणी केली. यानंतर कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला होणार आहे. यामुळे मरीन ड्राइव्ह ते हाजीअली फक्त काही मिनिटांमध्ये गाठणे शक्य होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केलं.

साधरण वर्षभरापासून राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. अजित पवार गट २ जुलै २०२३ रोजी शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला. त्यावेळी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अजितदादांच्या गटातील नेत्यांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळाली होती. या विस्तारानंतर परत एकदा मंत्रिमंडळ विस्तार होईल असं म्हटलं जात होतं, मात्र आता वर्ष उलटत आलं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. मंत्रिपदाची वाट पाहणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांना दिलासा देणारी बातमी मुख्यमंत्री शिंदेंनी दिलीय. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाईल असं शिंदे म्हणालेत. कोस्टल रोडच्या पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दरम्यान आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज कोस्टल रोडची पाहणी केली. आजपासून कोस्टल रोडचा दुसरा बोगदा खुला झालाय. यामुळे मरीन ड्राइव्ह ते हाजीअली फक्त काही मिनिटांमध्ये गाठणे शक्य होणार आहे. आधी ४० ते ५० मिनिटं लागत होती आता ९ मिनिटात हा टप्पा पार करता येणार आहे.

याप्रकरणी बोलतांना शिंदे म्हणाले, आज पून्हा एकदा वाहतूकीला दिलासा मिळेल. वरळीकडे जाणार मार्ग आज ओपन झालाय. या बोगद्याचं अंतर ६.५ किमी आहे. तर पुढील रस्ता म्हणजे तिसरा टप्पा १० जुलै रोजी सुरू केला जाणार आहे. अत्यावशक सर्व यंत्रणा या भूमिगत रस्त्यात आहेत. लवकरच हा रस्ता वरळी सी लिंकला जोडला जाईल,असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत. मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यान तयार करण्यात आलेल्या बोगदा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. हा मार्ग सोमवार ते शुक्रवारदरम्यान खुला असणार आहे. तर इतर दोन दिवस हा मार्ग इतर कामांसाठी बंद असणार आहे.

कोस्टल रोडची वैशिष्ट्ये

प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी- लिंकपर्यंत बोगदा असणार आहे.

या प्रकल्पात दोन मोठे बोगदे

बोगद्यासाठी मावळा टनेल बेरिंगचा वापर

तब्बल ३४ टक्के इंधनाची बचत होणार आहे.

मुंबईकरांच्या प्रवासाचा ७० टक्के वेळ वाचणार आहे.

कोस्टल रोडची लांबी १०.५८ किमी आहे.

CM Shinde Coastal Road Inspection: रस्त्यांच्या विस्ताराप्रमाणे मंत्रीमंडळाचा विस्तारही लवकरच होईल: मुख्यमंत्री शिंदे
Maharashtra Politics: केंद्रातील मंत्रीपदावरुन खदखद! १ खासदार असलेल्यांना कॅबिनेट, शिंदे गटाबाबत दुजाभाव का? श्रीरंग बारणेंचा सवाल!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com