Ajit Pawar Exclusive
Ajit Pawar Exclusive Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar Exclusive: मुख्यमंत्रिपदावर आताही दावा, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar Exclusive Interview: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीत दिलखुलास गप्पा मारल्या. या मुलाखतीत २०२४ ला तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा क्लेम (दावा) ठेवणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अजित पवारांनी २०२४ लाच काय आताही ठेवायला तयार आहे असं उत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडणार का?, अजित पवार भाजपसोबत जाणार का?, राजकीय भूकंप होणार का?, या सगळ्या प्रश्नांवर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीत दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं इतकं आकर्षण का?

यावेळी अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपदाचं इतकं आकर्षण का? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचं अजिबात आकर्षण नाही, २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळेल एवढी संख्या मतदारांनी दिली होती. राजकीय जीवनात काम करताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. त्यामुळे ते सांगतील ते ऐकावं लागतं". (Breaking Marathi News)

"२००४ मध्ये राष्ट्रवादीला विधानसभेत ७१ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या लोकांनी मानसिकता केली होती की, राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद जाईल, पण दिल्लीत काय घडलं माहिती नाही. निरोप आला की आपल्याकडे उपमुख्यमंत्रीपद राहणार", असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले, "त्यानंतर आम्ही बहुमाताने विधिमंडळाचे नेते म्हणून आर.आर. पाटील यांची निवड केली होती. त्यामुळे कदाचित मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आलं असतं, आम्ही ते घेतलं असतं तर राष्ट्रवादीचा नेता म्हणून २००४ साली आर.आर. पाटील मुख्यमंत्री झालेलं आपण सर्वांनी पाहिलं असतं".

"त्यावेळी आम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी नाही मिळाली. शेवटी प्रयत्न करणं आपलं काम असतं. नंतरच्या काळात आम्ही दोन नंबरचा पक्ष राहिलो. त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, म्हणून उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं", असं अजित पवारांनी सांगितलं.

दरम्यान, २०२४ ला तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा दावा ठेवणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. तेव्हा २००४ काय आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठेवायला तयार आहे, असं उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report: दक्षिण मुंबईत कोणत्या शिवसेनेचा विजय होईल? कोणाजी ताकद जास्त?

Ashvini Mahangade: "बापमाणूस मिळायला भाग्य लागतं...."; अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावूक

Summer Travel Tips: उन्हाळ्यात फिरायला जाताना या गोष्टी बॅगेत ठेवायला विसरु नका; ऐनवेळी सापडाल अडचणीत

Pune Crime News: पुण्यात सिनेस्टाईल थरार; दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, लाखोंचा माल लंपास

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

SCROLL FOR NEXT