Sharad Pawar News: खारघर दुर्घटनेवर शरद पवार पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले; म्हणाले, सरकारमुळेच...

Sharad Pawar On Kharghar Heat Storke: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खारघर घटनेवर महत्त्वाचं वक्तव्य केलंय.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV
Published On

Sharad Pawar On Kharghar Heat Storke: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खारघर घटनेवर महत्त्वाचं वक्तव्य केलंय. खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्याचं आयोजन सरकारकडून करण्यात आलं होतं. असं असूनही सरकारने खबरदारी घेतली नाही, सरकारच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar
Maratha Reservation In Maharashtra: मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

या ठिकाणी जे काही घडलं, त्याची जबाबदारी कुणी घ्यायची, असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. शिवाय या घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी सुद्धा शरद पवारांनी केली आहे. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी खारघरमध्ये घटनेवर पहिल्यांदाच भाष्य केलं. (Breaking Marathi News)

काय म्हणाले शरद पवार?

खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्याचं आयोजन सरकारकडून करण्यात आलं होतं. इतका उन्हाळा असताना देखील सरकारने कार्यक्रम घेतला. असं असूनही सरकारने खबरदारी घेतली नाही, सरकारच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. निवडणूकीआधी त्यांना प्रचंड शक्ति जमवून राजकीय शक्ती दाखवायची होती. त्याची किंमत लोकांना द्यावी लागली, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar
Maharashtra Politics: "संजय राऊतांमुळेच अजित पवार महाविकास आघाडीला सोडून जातील"

'खारघर दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करा'

पक्षाचं शिबीर उन्हाळ्यात घेताना काळजी घेता, मग या ठिकाणी का काळजी घेतली गेली नाही असा सवाल शरद पवार यांनी केला. या घटनेची चौकशी आता अधिकाऱ्याच्या समितीकडून करण्यात येत आहे. अधिकारी कितीही प्रामाणिक असला तरी तो राज्य सरकारच्या विरोधात अहवाल देत नाही. त्यामुळे खारघर घटनेची सत्यता लोकांसमोर येणार नाही. त्यामुळे या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली.(Maharashtra Political News)

'सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला'

सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामामध्ये 40 जवानांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. शरद पवार म्हमाले की, "देशात सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दोन मुलांची भांडण झाली तर ईडी मागे लावेल अशी धमकी दिली जाते. इतकी ही व्यवस्था घराघरात पोहचली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com