Maharashtra Politics: "संजय राऊतांमुळेच अजित पवार महाविकास आघाडीला सोडून जातील"

Political News: शिवसेनेतले 40 आमदार संजय राऊत यांना कंटाळून बाहेर पडले. आणि आता अजित पवारही महाविकास आघाडीला संजय राऊत यांच्यामुळेच सोडून जातील",
Sanjay Raut vs Ajit Pawar
Sanjay Raut vs Ajit PawarSaam TV

अमर घटारे, साम टीव्ही

Maharashtra Political News: "संजय राऊत आणि अजित पवार यांचे शाब्दिक खटके उडत असल्याने महाराष्ट्रातल्या जनतेची करमणूक होत आहे, शिवसेनेतले 40 आमदार संजय राऊत यांना कंटाळून बाहेर पडले. आणि आता अजित पवारही महाविकास आघाडीला संजय राऊत यांच्यामुळेच सोडून जातील", असा खळबळजनक दावा भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार अशाही उलट सुलट चर्चा सुरू आहे. या चर्चांवर अजित पवारांनी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. मी राष्ट्रवादी कुठेही जाणार नाही, असं पवारांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut vs Ajit Pawar
Maharashtra Politics: राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार; राष्ट्रवादीच्या आमदाराचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात खळबळ

संजय राऊत अजित पवारांमध्ये शाब्दिक चकमक

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक रंगली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये पक्षाची बाजू मांडण्यावरून वाद झाला आहे. राऊत यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्या सारखं बोलू नये. त्यांनी आमचं वकीलपत्र घेऊ नये, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Breaking Marathi News)

तर शिवसेना फुटली होती तेव्हा तुम्ही आमचं वकीलपत्र का घेतलं होतं? असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. आज तर अजित पवार यांनी कोण संजय राऊत? असा सवालच भर पत्रकार परिषदेत विचारला आहे. त्यामुळे अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात वाद रंगण्याची चिन्हे अधिकच दिसत आहे. (Maharashtra Political News)

Sanjay Raut vs Ajit Pawar
Kopargaon APMC Election : बाजार समितीत भाजप-राष्ट्रवादी-ठाकरे गटाची युती, अहमदनगरमधील अनोख्या युतीची चर्चा

भाजप खासदार अनिल बोंडे काय म्हणाले?

"शिवसेना फोडण्यात संजय राऊत (Sanjay Raut) यांचा मोठा वाटा होता. आता अजित दादांना महाविकास आघाडीतून काढायचं असेल, तर संजय राऊत ज्यांचं ते ऐकतात त्यांच्या म्हणण्यानुसार अजित पवारांना ते बरोबर बाहेर काढतील, शरद पवारांनी जसं सांगितलं तसं ते काम करत आहे, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी शिवसेना फोडली व त्यांच्या सल्ल्याप्रमाणे ते आता महाविकास आघाडी फोडतील", असा टोला अनिल बोंडे यांनी लगावला

'राऊत अजितदादांमुळे महाराष्ट्रातील जनतेची करमणूक'

संजय राऊत आणि अजित पवार यांचे शाब्दिक खटके उडत असल्याने महाराष्ट्रातल्या जनतेची करमणूक होत आहे, असा टोलाही अनिल बोंडे यांनी लगावला. इतकंच नाही तर, शिवसेनेतले 40 आमदार संजय राऊत यांना कंटाळून बाहेर पडले. आणि आता अजित पवारही महाविकास आघाडीला संजय राऊत यांच्यामुळेच सोडून जातील, असंही अनिल बोंडे म्हणाले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com