Ajit Pawar And Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : बारामतीत पवार कुटुंबीयांचे यंदा दोन पाडवे का? अजितदादांनी सांगितलं कारण,VIDEO

sharad pawar vs ajit pawar : बारामतीत पवार कुटुंबीयांचे दोन पाडवे साजरे होत आहेत. यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे.

मंगेश कचरे

बारामती : देशासहित राज्यात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ऐन निवडणुकीत दिवाळी आल्याने राजकीय पक्षांचा उत्साह दुपट्टीने दुणावला आहे. पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बारामतीतही दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. दरवर्षी पवार कुटुंबीयांकडून एकच दिवाळी पाडव्याचे आयोजन केलं जातं. मात्र, यंदा बारमतीत पवार कुटुंबीयांचे दोन पाडवे पाहायला मिळाले. यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या पाडव्यावर अजित पवारांनी भाष्य केलं.

बारामतीत यंदा शरद पवारांचा वेगळा पाडवा पाहायला मिळाला. तर अजित पवारांचा दुसरा पाडवा पाहायला मिळाला. बारामतीमधील दोन पाडव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. याबाबत अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

अजित पवार म्हणाले, 'एकाच ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये. लोकांना ताटकळत बसायला लागू नये. यामुळे आम्ही पाडवा वेगळा घेतला आहे. आम्ही गर्दी तुरळक करण्याकरिता हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही हा पाडवा वर्षानुवर्ष काटेवाडीतच करत आलो आहोत'.

दिवाळीच्या शुभेच्छा देताना अजित पवारांनी म्हटलं की, 'राज्यातील जनतेला माझ्याकडून खूप शुभेच्छा. वसुबारसने दिवाळीची सुरुवात होते, तुळशीच्या लग्नाने दिवाळीचा शेवट होतो'.

गावभेटीच्या दौऱ्याविषयी भाष्य करताना अजित पवारांनी म्हटलं की, 'एका दिवसात एवढी गावे होत नाहीत. माझा दौरा हा चुकीचा झालेला आहे. त्यामुळे मी पुढील गावातील दौरा रद्द केला असून तो भाऊबीजेच्या दिवशी पुढचा दौरा पूर्ण करेल'.

अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केलं. 'लाडकी बहीण सुरू योजना चालू राहण्यासाठी सगळ्यांनी बहुमत महायुती सरकारला दिले पाहिजे,असे आवाहन नागरिकांना आम्ही करत आहोत, असे अजित पवारांनी सांगितले.

'लोकसभेला वेगळा निकाल लागला. तो लोकांचा अधिकार आहे. मात्र मतदारांना बळजबरी कोणीच करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे, असे अजित पवारांनी सांगितले.

दौंड विधानसभेत महायुतीचे दोन उमेदवार आहेत. भाजपसहित अजित पवार गटाच्या उमेदवाराकडेही एबी फॉर्म आहे. यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, 'महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांची एकत्रित बैठक होईल. यावर योग्य तो तोडगा काढला जाईल. देवेंद्र फडवणीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि मी काल बसलो होतो. याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल. ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांचे फॉर्म मागे घेण्याकरिता जबाबदाऱ्या पार पाडणार आहोत'.

दौऱ्याविषयी सांगताना अजित पवार म्हणाले, 'एका दिवसात जास्तीत जास्त 25 गावे होऊ शकतात. दिवसभरात येण्या जाण्यात वेळ खूप जातो. कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घ्यावा लागतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT