मंगेश कचरे, साम टीव्ही
भवानीनगर ता. इंदापूर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर यांच्यासह दहाजण हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीला तब्बल पाच वर्षांनी मुहूर्त मिळाला असून संचालक पदासाठी इच्छूकांची संख्या मोठी आहे.
काल या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून अजित पवार यांनी देखील मतदान केले. तसेच त्याचवेळी शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. आज या निवडणुकीचा निकालासाठी मतमोजनीची प्रक्रिया सुरू आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाचे उमेदवार हे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील ‘जय भवानी माता’ पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती प्रचारप्रमुख किरण गुजर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
ही निवडणूक बॅलट पेपरच्या माध्यमातून होत असल्याने मतमोजणीस विलंब होत आहे. मात्र, सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व कल स्पष्ट होतील, आणि रात्री दहा वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. किरण गुजर यांनी सांगितले की, सभासदांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे तसेच राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ‘जय भवानी माता’ पॅनलला भरघोस मतदान केले आहे.
ही निवडणूक पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात विशेष लक्षवेधी ठरली असून, यामधून स्थानिक जनतेचा विश्वास कोणत्या नेतृत्वावर आहे, हे स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.