Air India Plane Crash  x
मुंबई/पुणे

Plane Crash : अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबरमध्ये बदलापूरचा तरूण; कुटुंबीय म्हणाले, आमचा देवावर विश्वास, रडून रडून वडिलांचे डोळे सुकले

Ahmedabad Air Plane Crash : दुर्घटनेतील अपघातग्रस्त विमानात बदलापूरचे दीपक पाठक असल्याची माहिती समोर आली आहे. केबिन क्रू मेंबर्समध्ये दीपक पाठक यांचा समावेश आहे.

Yash Shirke

मयुरेश कडाव, साम टीव्ही, प्रतिनिधी

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये विमान ७०० फूटांवरुन खाली कोसळले. ज्या वेळेस अपघात झाला, तेव्हा विमानामध्ये २४२ जण होते. विमानाच्या क्रू मेंबर्समध्ये बदलापूरच्या दीपक पाठक यांचाही समावेश आहे. आज सकाळीच टेकऑफ करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर अपडेट केले होते.

मागील पंधरा वर्षांपासून दीपक पाठक हे एअर इंडियामध्ये नोकरीला आहेत. त्याचे कुटुंब कात्रप भागातील रावल कॉम्प्लेक्समध्ये अनेक वर्षांपासून राहत आहेत. आमचा देवावर पूर्ण विश्वास असून आम्ही दीपक यांच्या बाबतीत आशावादी आहोत असे त्यांच्या दोन्ही बहिणींनी म्हटले आहे. विमानाला अपघात झाल्याची माहिती समजताच केबिन क्रू एक्झिक्यूटिव्ह दीपक पाठक यांच्या घराकडे शेजाऱ्यांसह स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली.

Air India flight AI 171 विमानाचा अहमदाबादमध्ये अपघात झाला. या विमानात १६९ भारतीय प्रवासी, ५३ ब्रिटीश प्रवासी, ७ पोर्तग्रीज प्रवासी आणि १ कॅनेडियन प्रवासी होते. याशिवाय विमानात १० कॅबिन क्रूसह २ पायलट होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील या विमानात असल्याची माहिती समोर आली आहे.

दुपारी एकच्या सुमारास विमान दुर्घटना घडली. विमान अहमदाबादच्या मेघानीनगरमधील सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले. हॉस्टेलमधील इंटर डॉक्टर्सना दुखापत झाल्याचेही म्हटले जात आहे. विमान कोसळल्याने हॉस्टेलची इमारती कोलमडली. अपघाताच्या दरम्यान भीषण आग लागली. अग्निशमन दल, आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्याला सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT