Ahamadnagar News Saam Digital
मुंबई/पुणे

Ahamadnagar News : महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवसेनेच्या संपर्कप्रमुखावर गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ

Ahamadnagar Crime News : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sandeep Gawade

सुशिल थोरात

Ahamadnagar News

फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका पीडित महिलेच्या फिर्यादी वरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2020 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून त्या पीडित महिलेची आणि सचिन जाधव यांची ओळख झाली होती. त्या महिलेबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करून महिलेचे विचित्र अवस्थेतील फोटोही काढून घेतले होते आणि कोणाला काही सांगितले तर फोटो व्हायरल करण्याची आणि मी तुझ्या मुलांना जिवे ठार मारुन टाकीन असा दम दिल्याने ती महिला भयभीत झाल्याने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.

मात्र वारंवार सचिन जाधव धमकी देत असल्याने महिलेने अखेर नगर शहर सोडून 2021 मध्ये पुणे शहर गाठले होते तेथे वास्तव्य करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्या ठिकाणी कुटुंबाचा आर्थिक खर्च भागत नसल्याने ती महिला पुन्हा अहमदनगर शहरात राहण्यास आली. ही गोष्ट सचिन जाधव यांना कळल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मोबाईलवरून त्या महिलेला संपर्क साधणे सुरू केले. विचित्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा अत्याचार करण्यास सुरुवात केली. पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याने पीडित महिलेला गरोदर राहिली त्यामुळे घाबरलेल्या सचिन जाधव यांनी त्या महिलेला गर्भ काढून टाक म्हणून पुन्हा छळ करण्यास सुरुवात केली होती.

याच वादातून एके दिवशी झालेल्या भांडणात सचिन जाधव यांनी त्या महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने त्या पीडित महिलेचा अनैसर्गिक गर्भपात झाला होता. त्यानंतर पुन्हा सचिन जाधव याने त्या महिलेची संबंध ठेवून या संबंधातून एका मुलाला जन्म दिला मात्र त्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन सचिन जाधव वारंवार त्या पीडित महिलेवर अत्याचार करत राहिला. या धमकीला आणि सर्व बळजबरीला कंटाळून अखेर त्या पीडित महिलेने पोलीस स्टेशनला धाव घेऊन सचिन तुकाराम जाधव याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात सचिन जाधव यांच्याविरुद्ध 376, 376(2)(एन) 315, 323, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचा हफ्ता पुढच्या आठवड्यात मिळणार; ई-केवायसीला लावला ब्रेक

Malavya Rajyog: नोव्हेंबरमध्ये शुक्र ग्रह बनवणार मालव्य महापुरुष राजयोग, 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

Maharashtra Live News Update: पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह, सारसबागेत मोठी गर्दी

Maharashtra Rain Alert : ऐन दिवाळीत पावसाचा हाहाकार! विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस, आज ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा

Solapur Politics: 'ऑपरेशन लोटस'ला धक्का; इनकमिंगला भाजपमधून विरोध, देशमुख-माने संघर्ष चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT