Wardha News : बारावीच्या विद्यार्थ्याचा वडिलांसह कॅनाॅलमध्ये बुडून मृत्यू

चेतन कोहळे हा बारावीत होता. त्याचा आज (गुरुवार) पेपर होता. शेतात ओलित करण्याकरिता ताे त्याच्या वडिलांच्या मदतीकरिता गेला होता. मात्र, तेथे अनर्थ घडला.
arvind kohale and chetna kohale died in water canal near salfhal aarvi wardha
arvind kohale and chetna kohale died in water canal near salfhal aarvi wardhasaam tv
Published On

- चेतन व्यास

Wardha :

शेतातील ओलित आटोपल्यावर मातीने माखलेले हातपाय धुण्यासाठी कॅनलवर गेलेल्या मुलाचा पाय घसरून तो कॅनलमध्ये पडला. त्याला वाचविण्याकरिता वडिलांनी कॅनलमध्ये उडी घेतली. मुलाल वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलही बुडाले. हृदयाचा थरकाप वाढविणारी घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सालफळ येथे बुधवारी घडली. या घटनेत अरविंद मधुकर कोहळे (वय ५५) व चेतन अरविंद कोहळे (वय १८) या बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

सालफळ येथील अरविंद कोहळे व चेतन कोहळे हे बापलेक कॅनल जवळील शेतात पाण्याचे ओलित करीत होते. ओलीत संपल्यावर मुलगा चेतन हा पाय धुण्यासाठी कॅनलवर गेला. यावेळी तो पाय घसरून कॅनलमध्ये पडला. त्याला वाचविण्यासाठी वडील अरविंद कोहळे हे गेले. परंतु ते देखील पाण्यात बुडाले. या घटनेत दाेघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत दाेघे घरी न आल्याने पन्नास साठ ग्रामस्थ शेताच्या रस्त्याने निघाले असता त्यांना बैल एकटेच येताना दिसले.

arvind kohale and chetna kohale died in water canal near salfhal aarvi wardha
School Timing Changed : शाळा सकाळच्या सत्रात भरवा; उन्हाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचा आदेश

त्यांनी शेताजवळ जाऊन पाहिले असता त्या दोघांच्याही चपला कॅनलच्या जवळ दिसल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी दोघांचा शोध सुरू केला. रात्री अकरा वाजता त्यांना अरविंद यांचा म्रुतदेह सापडला. आज सकाळी सहा वाजता ग्रामस्थांना चेतनचा मृतदेह सापडला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुलगाव पोलिसांनी दोन्ही मृतदेह पुलगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता नेले. या घटनेने विरूळ परिसरात सर्वत्र शोककळा पसरली. पुढील तपास पुलगाव पोलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

arvind kohale and chetna kohale died in water canal near salfhal aarvi wardha
Saam Impact : शाळेच्या व्हरांड्यात बसून धडे गिरवणा-या विद्यार्थ्याला शिक्षणाची कवाडे खूली, 'साम टीव्ही' मुळेच झाले शक्य आरे ग्रामस्थांची भावना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com