Dinanath Mangeshkar Hospital Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाला जाग; दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या ऑडिटसाठी समिती स्थापन

Pune Dinanath Mangeshkar Hospital News: पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळीच दाखल न केल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाला आता जाग आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नितीन पाटणकर, साम टीव्ही प्रतिनिधी

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला वेळीच दाखल न केल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. आधी १० लाख भरा मगच उपचार करु असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी आता हॉस्पिटलचे ऑडिट करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.

एका महिलेचा मृत्यूनंतर आरोग्य विभागाला जाग आली आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे ऑडिट करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. समितीसाठी पाच प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात योग्यरित्या अहवाल सादर करण्याचे आरोग्य विभागाने आदेश दिले आहेत. समितीचे सदस्य आणि अध्यक्ष स्वतः दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करणार आहेत. याबाबत ऑडिट रिपोर्ट चौकशी केल्यानंतर सादर करणार आहेत

श्रीमती तनिशा सुशांत भिसे या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे प्रसुतीसाठी आल्या असता त्यांना अॅडमिशनसाठी १० लाखाची मागणी केली व त्यांना दाखल करुन घेतले नाही. त्यानंतर सदर पेशंट मनिपाल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने याबाबतच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रसिध्द झाल्या आहेत.

सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी खालील प्रमाणे चौकशी समिती गठित करण्यात येत आहे.

१) डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडल, पुणे अध्यक्ष

२) डॉ. प्रशांत वाडीकर, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुगे सदस्य

३) डॉ. नागनाथ यम्पल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय औंध, पुणे -सदस्य

४) डॉ. निना बोराडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पुणे महानगरपालीका, पुणे सदस्य

५) डॉ. कल्पना कांबळे, वैद्यद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे सदस्य

तरी सदर प्रकरणी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे व मनिपाल हॉसिपटल, पुणे येथे भेट देऊन सखोल चौकशी करुन चौकशी अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह व आवश्यक त्या दस्तऐवजासह तात्काळ या कार्यालयास सादर करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT