Pune Police  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Police News: कोल्हापुरातील परिस्थिती चिघळल्यानंतर पुणे पोलिसांची सावध भूमिका, अधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना

Pune Police On Alert Mode : कोल्हापुरात मोर्चाला हिंसक वळण लागल्याने कोल्हापूर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

साम टिव्ही ब्युरो

Pune News : कोल्हापुरातील काही जणांना आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने तणावाचा वातावरण निर्माण झालं होते. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने कोल्हापूर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

कोल्हापुरातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. हिंसाचाराच्या परिस्थितीमुळे कोल्हापुरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे. (Maharashtra News)

शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन तसेच सोशल मीडियातील मेसेजेसवर लक्ष ठेवा अशा सूचना वरिष्ठाकडून आल्या आहेत.

शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात थांबावे, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

कोल्हापुरात नेमकं काय घडलं?

कोल्हापुरमध्ये मंगळवारी काही लोकांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. या मुद्द्यावरुन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर बुधवारी या पोस्टच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत कोल्हापूर बंदची हाक दिली. या आंदोलनादरम्यान दगडफेकीची घटना घडल्याने आंदोलन चिघळलं. त्यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. या घटनेनंतर कोल्हापुरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

Crime: कौटुंबिक वाद टोकाला भिडला; रागच्या भरात पत्नीचा गळा आवळला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग; Video

ओबीसी मेळाव्यातून पंकजा मुंडे टार्गेट? गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा

Voter List Scam: मतदारयांद्यामधील घोळावरुन विरोधक बरसले, निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा

SCROLL FOR NEXT