Political News: नुसती ट्विटरवरून टीका करून कामं होत नाहीत; खासदार श्रीकांत शिंदेंची मनसे आमदार राजू पाटलांवर टीका

Shrikant Shinde Vs Raju Patil: दिव्यातील रस्ते जलवाहिन्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ यांच्या हस्ते करण्यात आले.
Shrikant Shinde Vs Raju Patil
Shrikant Shinde Vs Raju PatilSaam TV

Thane News : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकमेकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. तर दुसरी एकनाथ शिंदे यांचे चिंरजीव, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे मनसेच्या आमदारावर निशाणा साधताना दिसत आहेत.

श्रीकांत शिंदे यांनी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्यावर मतदार संघातील विकासकामांच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. ट्विटरवरून टीका करून काम होत नाही, खाली जमिनीवर उतरून काम करावं लागतं, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लागवला आहे. (Breaking News)

Shrikant Shinde Vs Raju Patil
Rahul Narwekar statement: मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन! शिंदेंच्या मंत्र्यांसमोरच राहुल नार्वेकरांच सूचक वक्तव्य

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

दिव्यातील रस्ते जलवाहिन्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, वर्षभरात आता विधानसभेची निवडणूक येईल. गेल्या निवडणुकीत आपण ज्या लोकांना मतदान करुन निवडून दिलं त्यांना मागील पाच वर्षात दिव्यासाठी काय केलं? याचं उत्तर मागिलतं पाहिजे.  (Latest Marathi News)

Shrikant Shinde Vs Raju Patil
Diva Cluster Scheme: ठाण्याच्या धर्तीवर दिव्यातही क्लस्टर योजना राबवणार; CM एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

फक्त ट्विटरवरून टीका करून काम होत नाही. खाली उतरून काम करावं लागतं, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी आमदार राजू पाटील याचं नाव न घेता केली. तसेच जसे आमचे नगरसेवक पदाधिकारी याठिकाणी काम करत आहेत आणि मला विश्वास आहे आपला पदाधिकारी हा आपल्या सेवेत तत्पर आहे. आपण दाखवलेल्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही, असा शब्द श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित जनतेला दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com