Ajit Pawar Meeting with Central Mard Organization Saam Tv
मुंबई/पुणे

Doctors Strike: राज्यातील निवासी डॉक्टरांचं संप मागे; काय होत्या मागण्या अन् अजित पवार यांनी कोणतं आश्वासन दिलं?

Maharashtra Doctor Strike: एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील निवासी आपला प्रस्तावित संप मागे घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Doctor Strike:

एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील निवासी आपला प्रस्तावित संप मागे घेतला आहे. राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून आपला प्रस्तावित संप मागे घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन सेंट्रल मार्ड संघटनेने आपला प्रस्तावित संप मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली. त्यानंतर सेंट्रल मार्ड संघटनेने आपला प्रस्तावित संप मागे घेतला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न वसतिगृहांच्या तक्रारींसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वसतिगृहांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत. विविध जिल्ह्यांत मंजूर करण्यात आलेल्या वसतिगृहांच्या बांधकामांना गती देण्यात यावी. शासनाने नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करताना त्याच्या आराखड्यात वसतिगृहाचा समावेश केला आहे. त्यामुळे नवीन महाविद्यालयांमधील डॉक्टरांना पहिल्या दिवसापासूनच चांगल्या दर्जाची वसतिगृहे उपलब्ध होणार आहेत. (Latest Marathi News)

अस्तित्वातील वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठीचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला प्राधान्य देऊन तातडीने दुरुस्तीची कामे सुरु करावीत. त्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर आज घेण्यात आलेल्या निर्णयांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वसतिगृहांच्या दुरुस्तीदरम्यान विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांच्या परिसरात पर्यायी मोकळ्या खोल्या मिळण्यात अडचणी येतात. अशा वेळी गरजेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भाड्याने खोल्या घेऊन राहता येण्यासाठी ठराविक भाडे देण्यात यावे. शक्य असेल त्याठिकाणी त्यांना पर्यायी खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

काय आहेत डॉक्टरांच्या मागण्या?

  • कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृह निवासाची उपलब्धता करून द्यावी.

  • दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत थकबाकी असलेले स्टायपेंड मंजूर करावे.

  • निवासी डॉक्टरांच्या बँक खात्यात स्टायपेंडचे पैसे यावेत.

  • केंद्रीय संस्थांप्रमाणेच स्टायपेंडच्या रकमेत वाढ करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT