adivasi brihad morcha reached kasara ghat know the traffic details  Saam Digital
मुंबई/पुणे

Kasara Ghat Traffic Update: आदिवासी विभागाचा बिऱ्हाड मोर्चा पाेचला कसारा घाटात, जाणून घ्या वाहतुकीची स्थिती

adivasi brihad morcha reached kasara ghat know the traffic details: दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण होईपर्यंत शासन सेवेत संरक्षण देण्यात यावे.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला बिऱ्हाड माेर्चा आज (शुक्रवार) कसारा घाटात पाेहचला. यावेळी माेर्चेक-यांनी घाट रस्त्यातच ठिय्या मांडला. यामुळे दोन्ही महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. या आंदाेलनामुळे वाहनांच्या एक ते दोन किलो मीटर अंतरापर्यंत रांग लागली आहे.

राज्यभरातील आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून विविध मागण्यांसाठी बिऱ्हाड मोर्चाला बुधवारी प्रारंभ झाला. आज माेर्चा कसारा घाटात पाेहचला. येथे माेर्चक-यांना घाेषणाबाजी करीत अचानक ठिय्या मांडल्याने वाहतुक खाेळंबली आहे.

अशा आहेत मागण्या

शाळेतील आणि वसतिगृहातील रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी यांचा हा बिऱ्हाड मोर्चा आहे.

२५ मे २०१३ रोजीचे आदिवासी विकास विभागाचे शासन पत्र रद्द करावे.

दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर बाहेरील कर्मचाऱ्यांना घेऊ नये.

दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण होईपर्यंत शासन सेवेत संरक्षण देण्यात यावे.

त्यांना सेवेतून कमी करू नये.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chembur Exit Poll: चेंबूर मतदारसंघातून कोण मारणार बाजी? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे होणार आमदार? पाहा Exit Poll

Wardha Exit Poll: वर्ध्यात भाजपचे पंकज भोयर तिसऱ्यांदा होणार आमदार? पाहा Exit Poll

Maval Exit Poll Result : बंडखोर की विद्यामान, मावळची जनता कुणाच्या मागे? एक्झिट पोलचा अंदाज काय?

Pension: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ दिवसांत हे काम करा, नाहीतर पेन्शन विसरा

SCROLL FOR NEXT