Aaditya Thackeray on Metro Carshed Saam TV
मुंबई/पुणे

Aaditya Thackeray on Metro Carshed: आरे कारशेडच्या कामात मोठा घोटाळा? आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर गंभीर आरोप

Aaditya Thackeray News : ठाकरे गटाचे नेते आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Aaditya Thackeray on Metro Carshed: ठाकरे गटाचे नेते आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आरे येथील सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या कामात शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना मेट्रो कारशेट आरेतून कांजूरमार्गला हलवण्यात आलं होतं. पण सरकार कोसळल्यानंतर पुन्हा कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वादही निर्माण झाला होता. दरम्यान, आता आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईत पत्रकापरिषद घेऊन सरकारवर गंभीर आरोप केले.

आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

आदित्य ठाकरे म्हणाले, "महसूल खात्यानं कलेक्टरला सांगितलं आहे की, मेट्रो ६ साठी आपण कांजूरमार्गच्या जागेपैकी १५ हेक्टर जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करावी, आजची ही बातमी मुंबईच्या दृष्टीकोनातून मोठी आहे. यातून एकच सिद्ध होतं की, आम्ही गेल्या अडीच तीन वर्षे जे बोलत आलो आहोत की, मेट्रो ६ साठी कांजूरमार्गची कारशेड गरजेची आहे". (Breaking Marathi News)

"या कारशेडसाठी २०१८ मध्ये टेंडर काढलं होतं, पण कारशेड बनवणार कुठं हा प्रश्नच होता. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कांजूरमार्गच्या ४४ हेक्टरच्या कारशेडमध्ये लाईन ३, लाईन ६, लाईन १४ आणि लाईन ४ या चार लाईन्सचे कारडेपो आपण एकत्र करणार होतो. यामागे जनतेचे, महाराष्ट्राचे पेसै आणि वेळ वाचावा हाच हेतू होता", असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आरे मेट्रो कारशेडच्या कामात १० कोटींचा घोटाळा?

"आम्ही ज्यावेळी कारशेड हलवण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी आरेमध्ये ८०० एकर जंगल आम्ही घोषित केलं होतं. नंतर जो काही राजकीय गोंधळ झाला त्यामध्ये मुंबईवर राग ठेऊन भाजपनं केंद्राला हाक दिली. केंद्राचे कमिशर, बिल्डर यांनी कोर्टात गोंधळ घालून दोन वर्षे हे काम बंद ठेवलं. मुंबईकरांना या इंटेग्रेटेड डेपोपासून बंद ठेवलं".

"त्यानंतर त्यांना पुन्हा कारशेड आरेत नेण्याचा कट केला. सरकारचा डोळा नक्की कशावर आहे. हा घोटाळा मोठा भयंकर आहे. यामध्ये ज्या मुंबईचे आणि महाराष्ट्राचे १० हजार कोटी वाचणार होते कारण एकच डेपो होणार होता. चार मेट्रो लाईन्सची एफिशिएन्सी वाढणार होती कारण एकाचा डेपोमुळं वेळ वाचणार होता", असंही आदित्य ठाकरे म्हणाले. (Maharashtra Political News)

'कांजूरमध्ये मेट्रो कारशेड झालं असतं तर...'

पुढे बोलताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, की “ चारही लाईन एकत्रितपणे कांजूरमार्गला आल्या असत्या तर कांजूरमार्ग नोडल पॉईंट झालं असतं. चार-साडेचार कोटी जनतेला एका नोडल पॉईंटवर जोडलं असतं. कांजूरमार्गमध्ये मेट्रो भवन झालं असतं. सगळ्या गाड्या एकाच ठिकाणी आल्या असत्या. आम्ही जेव्हा हे पाऊल उचललं तेव्हा आरेमधील ८५० एकर जागा सुरक्षित ठेवणार होतो. आरेतलं कारशेड आपण कांजूरमार्गला हलवणार होतो, असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

SCROLL FOR NEXT