Accident News: भजन गात भागवत कथेला निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठलं; भीषण अपघातात २० भाविकांचा मृत्यू

Uttar Pradesh Tractor Accident : उत्तरप्रदेशातील शाहजपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे.
Uttar Pradesh Tractor Accident News
Uttar Pradesh Tractor Accident News Saam TV

Uttar Pradesh Tractor Accident News : गेल्या काही दिवसांपासून देशातील रस्ते अपघातात मोठी वाढ आली आहे. दररोज कुठे ना कुठे भीषण अपघात झाल्याच्या घटना समोर येत आहे. एकीकडे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात होऊन १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे उत्तरप्रदेशातील शाहजपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. (Latest Marathi News)

भजन गात भागवत कथेला निघालेल्या भाविकांचा ट्रॅक्टर अचानक अनियंत्रित होऊन पूलावरून खाली कोसळला. या भयंकर घटनेत आतापर्यंत २० भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.

Uttar Pradesh Tractor Accident News
Viral Video : धक्कादायक! महिलेनं पाळीव कुत्र्याला लिफ्टमध्ये नेलं अन्.., निर्दयी कृत्याचा VIDEO व्हायरल

गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये महिला, पुरूष आणि लहान मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे.

अपघात नेमका कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, शाहजपूर (Uttar Pradesh) जिल्ह्यातील तिल्हार परिसरातील बिरसिंहपूर गावात या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. ही कथा ऐकण्यासाठी शनिवारी सकाळी शेजारील गावातील ४० ते ५० नागरिक ट्रॅक्टरने येत होते. (Breaking Marathi News)

दरम्यान, ट्रॅक्टर गररा नदीवर आला असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट पुलाच्या कठड्याला धडकला. काही कळण्याच्या आतच भाविकांनी भरलेली ट्रॉली थेट पुलावरून खाली कोसळली. या भयंकर घटनेत (Accident) ट्रॉलीमधील लहान मुलं, महिला आणि पुरूष, अशा १० जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. दरम्यान, गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी १० जणांना मृत घोषित केलं. त्यामुळे मृतांचा आकडा २० वर पोहचला असून अजूनही आकडा वाढण्याची शक्यता आहे.

या घटनेवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. "शाहजहांपूर जिल्ह्यात झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयाप्रती माझी संवेदना आहे. मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर करण्याचे तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जखमी झालेले भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रभू श्रीरामाची प्रार्थना करतो, असं ट्विट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com