Viral Video : धक्कादायक! महिलेनं पाळीव कुत्र्याला लिफ्टमध्ये नेलं अन्.., निर्दयी कृत्याचा VIDEO व्हायरल

Woman Beats Pet Dog : गुरुग्राम येथील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये महिलेनं पाळीव कुत्र्याबरोबर असं कृत्य केलंय, की ते पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
Woman Beats Pet Dog
Woman Beats Pet DogSaam TV

Woman Beats Pet Dog Viral Video : माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशी नातेसंबंध जोडत असतो. ज्यांच्या घरात पाळीव प्राणी असेल, तर तो त्या कुटुंबाचा एक सदस्यच होतो. घरातील एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे जिव्हाळा लावला जातो, प्रेम दिले जाते. त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यावरही अनेकजण प्रेम करतात. (Latest Marathi News)

मात्र, कधीकधी माणसाकडून निर्दयीपणाचा कळस गाठला जातो. दुसऱ्याचा राग माणूस पाळीव प्राण्यावर काढतो, अशीच एक धक्कादायक घटना गुरूग्राममधून समोर आली आहे. गुरुग्राम येथील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये महिलेनं पाळीव कुत्र्याबरोबर असं कृत्य केलंय, की ते पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Woman Beats Pet Dog
Shocking Video: मिरवणुकीनंतर हसत खेळत घराकडे निघाले; पण वाटेतच मृत्यूने गाठलं, विरामधील 'त्या' घटनेचा VIDEO समोर

या संतापजनक घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी या महिलेच्या क्रूर कृत्याचा निषेध केला असून महिलेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Breaking Marathi News)

महिलेचा पाळीव कुत्र्यावर अत्याचार

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला दोन पाळीव कुत्र्यांसह एका सोसायटीच्या लिफ्टमधून प्रवेश करताना दिसत आहे. लिफ्ट बंद झाल्यानंतर ही महिला यातील एका कुत्र्याला उचलते आणि जमिनीवर जोरजोरात आदळते. हा धक्कादायक प्रकार लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Viral Video) झाला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्राम येथील सेक्टर १०९ मध्ये एका व्यक्तीने परदेशी जातीचे दोन कुत्रे पाळले होते. या कुत्र्यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी त्यांनी एका महिलेकडे दिली होती. बुधवारी, ही महिला कुत्र्यांना सोसायटीच्या उद्यानात घेऊन गेली होती.

उद्यानात गेल्यानंतर यातील एका कुत्र्याने या महिलेवर हल्ला केला. त्याने महिलेला चावण्याचा प्रयत्न केला. यावरून महिला चांगलीच संतापली. तिने उद्यानातून कुत्र्यांना थेट सोसायटीत परत आणले. दरम्यान, लिफ्टमध्ये असताना महिलेने कुत्र्याला जोरजोरात जमिनीवर आपटले.

दरम्यान, घटनेचा व्हिडीओ समोर येताच पीपल फॉर अॅनिमल्स (पीएफए) या प्राणी कल्याणकारी संस्थेच्या स्वयंसेवकांनी महिलेविरोधात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनंतर कुत्र्यांची सुटका करण्यात आली. पीएफएने इंस्टाग्रामवर लिहिले की, “लिफ्टमध्ये वारंवार पिल्लाला मारल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ मिळाल्यानंतर, आमच्या कार्यालयाने तक्रारीवर तत्काळ कारवाई केली.”

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com